Illegal Water Absorption : दूरगाव तलावातून अवैध पाणी उपसा करणाऱ्या ३५ मोटारी जप्त; कर्जत प्रांताधिकारी पथकाची कारवाई

परतीच्या पावसाकडे शेतकऱ्यांचे डोळे

0
Illegal Water Absorption : दूरगाव तलावातून अवैध पाणी उपसा करणाऱ्या ३५ मोटारी जप्त; कर्जत प्रांताधिकारी पथकाची कारवाई
Illegal Water Absorption : दूरगाव तलावातून अवैध पाणी उपसा करणाऱ्या ३५ मोटारी जप्त; कर्जत प्रांताधिकारी पथकाची कारवाई

Illegal Water Absorption : कर्जत : दूरगाव (ता.कर्जत) तलावातून बेकायदेशीर आणि अवैध पाणी उपसा (Illegal Water Absorption) करणाऱ्यावर मंगळवारी (ता.८) सकाळी प्रांताधिकारी नितीन पाटील (Nitin Patil) यांच्या पथकाने कारवाई केली. या ठिकाणी महावितरणकडून (Mahavitaran) वीज पुरवठा खंडित करण्यात आला असून या कार्यवाहीत तब्बल ३५ मोटारी जप्त करण्यात आल्या आहेत.

नक्की वाचा : अस्टर फुलला पण भाव नाही, शेतकऱ्याचा संताप; उभ्या पिकावर फिरवला रोटर

परतीच्या पावसाकडे शेतकऱ्यांचे डोळे

मान्सून पावसाने मारलेली दडी तसेच कुकडी क्षेत्रातील अवर्तनाने नैसर्गिक जलस्रोतात असणाऱ्या तोकड्या पाणीसाठयावरच आता अनेक गावांची तहान भागणार आहे. परतीच्या पावसाकडे सर्वसामान्य शेतकरी आणि नागरिकांचे डोळे लागले आहे. सद्यस्थितीत आहे तो जलसाठा कायम राखण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी अहिल्यानगर डॉ पंकज आशिया यांच्या आदेशानुसार कर्जतचे प्रांताधिकारी नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार रवी सतवन, पोलीस विभाग कर्जत, कुकडीचे उत्तम धायगुडे, श्रीरंग मेहेरे यांनी मंगळवार, (ता. ८) रोजी सकाळी दूरगाव (ता.कर्जत) येथील तलावातून बेकायदेशीर आणि अवैध पाणी उपसा करणाऱ्यावर धडक कारवाई केली. तालुका प्रशासनाने अचानक टाकलेल्या धाडीने पाणी उपसा करणाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

वीज पुरवठा खंडित (Illegal Water Absorption)

 तब्बल ३५ अवैध आणि विना परवानगी पाणी उपसा करणाऱ्या मोटारी या पथकाने ताब्यात घेतल्या होत्या. मात्र अगोदरच वरुणराजाच्या वक्रदृष्टीने होरपळलेल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान नको म्हणून प्रशासनाने योग्य ती समज देत जप्त केलेल्या मोटारी सबंधित शेतकऱ्यांच्या ताब्यात देत कर्तव्य अधिकारी जबाबदारीतून माणुसकीचे दर्शन दिले. तसेच सदरच्या तलावाच्या ठिकाणी महावितरणकडून वीज पुरवठा खंडित करण्यात आला असून यापुढे कोणी ही तालुक्यातील कोणत्याच नैसर्गिक जलस्रोतामधून पाणी उपसा करणार नाही अशी तंबी दिली. या कार्यवाहीने तलाव परिसरात चांगलीच धावपळ उडाली होती.