Indian Armed Forces | भारतीय सशस्त्र दलात अधिकारी पदासाठी पूर्व प्रशिक्षणाची संधी

0

Indian Armed Forces | नगर : भारतीय सशस्त्र दलात (Indian Armed Forces) अधिकारी पदाच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांना ‘एसएसबी’ मुलाखतीची पूर्वतयारी करून घेता यावी, यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड येथे ४ ते २३ मे २०२६ या कालावधीत ‘एसएसबी कोर्स क्रमांक ६६’ आयोजित करण्यात आला आहे. या प्रशिक्षणासाठी निवडल्या जाणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांना निवास व भोजनाची सोय विनामूल्य उपलब्ध करून दिली जाणार आहे. जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी निवडीसाठी २५ एप्रिल २०२६ रोजी सकाळी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, अहिल्यानगर येथे मुलाखतीस उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विद्यासागर कोरडे यांनी केले.

हे वाचा – रस्ता काँक्रिटीकरणाची मागणी; काम सुरु न झाल्यास ३० एप्रिलला बैठा सत्याग्रहाचा इशारा

एसएसबी मुलाखतीसाठी पात्र (Indian Armed Forces)

निवडीसाठी उमेदवारांनी मुलाखतीस येताना सैनिक कल्याण विभागाच्या संकेतस्थळावरून ‘एसएसबी-६६’ कोर्सचा अर्ज डाउनलोड करून तो पूर्णपणे भरावा. तसेच अर्जाची प्रिंट व संबंधित मूळ कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे.उमेदवाराने सीडीएसई-यूपीएससी किंवा नॅशनल डिफेन्स अकॅडमी  परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी व ते एसएसबी मुलाखतीसाठी पात्र असावेत. तसेच एनसीसी स्पेशल एंट्री, टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्स किंवा विद्यापीठ प्रवेश योजना अंतर्गत प्रवेश घेतलेल्या उमेदवारांकडे एसएसबीचे कॉल लेटर असणे आवश्यक आहे.

अवश्य वाचा- खरातच्या कार्यक्रमात वरिष्ठ IPS अधिकाऱ्याची हजेरी; अंजली दमानियांचे गंभीर आरोप

अधिक माहितीसाठी (Indian Armed Forces)

अधिक माहितीसाठी उमेदवारांनी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड येथे प्रत्यक्ष भेट द्यावी किंवा [email protected] या ई-मेलवर संपर्क साधावा. तसेच ०२५३-२४५१०३२ किंवा व्हॉट्सअॅप क्रमांक ९१५६०७३३०६ वरही माहिती उपलब्ध आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here