Indurikar Maharaj : इंदोरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नस्थळी चोरी; दोघा संशयीतांकडून दोन लाख ८९ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

Indurikar Maharaj : इंदोरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नस्थळी चोरी; दोघा संशयीतांकडून दोन लाख ८९ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

0

Indurikar Maharaj : नगर : इंदोरीकर महाराज (Indurikar Maharaj) यांच्या मुलीच्या लग्न समारंभात झालेल्या साेनसाखळी चाेरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने (Local Crime Branch) छडा लावत दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून सुमारे २ लाख ८९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

नक्की वाचा: हुंड्यासाठी छळ; विवाहितेने विहिरीत उडी घेऊन संपवले जीवन

६० ग्रॅम सोन्याचे दागिने चोरट्यांनी केले होते लंपास

संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. लग्नस्थळी आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमादरम्यान फिर्यादी यांच्या गळ्यातील सुमारे ६० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी बळजबरीने लंपास केले होते. या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू असताना पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की, रेकॉर्डवरील आरोपी सागर सुरेश कांबळे हा साथीदारांसह चोरीतील सोन्याची वाटणी करण्यासाठी ममदापूर फाटा येथे येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता बबलू उर्फ अब्दुल इब्राहिम पिंजारी (वय ३६, रा. वॉर्ड नं. २, श्रीरामपूर), आतिक अयुब उर्फ आरिफ शेख व सनी विलास ढोकणे यांनी हा गुन्हा केला असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

आरोपी व जप्त मुद्देमाल संगमनेर पोलीसांच्या दिला ताब्यात (Indurikar Maharaj)

संशयित आरोपींकडून १ लाख ४९ हजार ५०० रुपयांचे ११.५ ग्रॅम सोन्याचे दागिने, ७० हजार रुपयांचे दोन मोबाईल फोन तसेच ७० हजार रुपयांची दुचाकी असा एकूण २ लाख ८९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ताब्यातील आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासासाठी संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. ही कामगिरी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या पथकाने केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here