पारनेर : मुंबई येथे सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये औचित्याच्या मुद्द्यावर बोलताना पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते (Kashinath Date) यांनी ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे (Anna Hazare) यांच्या प्रस्तावित उपोषणाचा (Hunger Strike) विषय अत्यंत संवेदनशीलपणे सभागृहात उपस्थित करत शासनाला तातडीने हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले.
नक्की वाचा : कडधान्य उत्पादन वाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार आवश्यक : विनयकुमार आवटे
येत्या ५ जुलैपासून उपोषणाचा इशारा
सभागृहात बोलताना आमदार दाते म्हणाले की, माझ्या २२४ पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघात पद्मभूषण अण्णा हजारे आणि पद्मश्री पोपटराव पवार यांच्य़ासारखे दोन थोर समाजसेवक आहेत. माहिती अधिकार कायद्यातील सुधारणांच्या संदर्भात अण्णांनी येत्या ५ जुलैपासून उपोषणाचा इशारा दिला आहे. अण्णांचे वय आज ९० वर्षे असून अशा वयात उपोषणाचा शारीरिक त्रास सहन करणे अत्यंत कठीण आहे. त्यामुळे माझ्या पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या वतीने शासनाला विनंती करतो की, अण्णांवर उपोषण करण्याची वेळ येऊ नये, यासाठी तातडीने सकारात्मक संवाद साधून मार्ग काढावा.”
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
दाते यांच्या भूमिकेची सर्वत्र चर्चा (Kashinath Date)
आमदार दाते यांनी अण्णा हजारे यांच्याविषयी व्यक्त केलेली ही आत्मीयता आणि त्यांच्या आरोग्याबाबत व्यक्त केलेली चिंता सभागृहाचे विशेष लक्ष वेधून घेत होती. मतदारसंघातील ज्येष्ठ समाजसेवकांचा सन्मान राखत, त्यांच्या आंदोलनामागील विषयावर शासनाने संवेदनशील भूमिका घ्यावी, अशी स्पष्ट अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. माहिती अधिकार कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आयुष्यभर संघर्ष करणाऱ्या अण्णा हजारे यांना उपोषणासारखे टोकाचे पाऊल उचलावे लागू नये, यासाठी शासनाने तातडीने पुढाकार घ्यावा, अशी भावना आमदार काशिनाथ दाते यांनी सभागृहात मांडल्याने त्यांच्या या भूमिकेची सर्वत्र चर्चा होत आहे.



