Knife Attack on Youth : नगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त (Dr. Babasaheb Ambedkar Jayanti) शहरात मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात आली होती. मात्र, मिरवणूक संपल्यानंतर काही वेळातच एका तरुणावर चाकूने हल्ला (Knife Attack on Youth) करण्यात आला. या हल्ल्यात अमोल वानखडे (वय२५) हा तरुण गंभीर जखमी झाला आहे.
नक्की वाचा : श्रीगोंद्यात गॅस एजन्सींचा मेसेज घोटाळा; डिलीवरी मिळण्यापूर्वीच डिलीवरी सक्सेसचा मेसेज
घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण
घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिक नागरिकांनी तत्काळ जखमी अमोलला उचलून जिल्हा रुग्णालयात दाखल केले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
प्राथमिक तपासात हा हल्ला वैयक्तिक वादातून झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण (Knife Attack on Youth)
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून सणाच्या दिवशी अशा प्रकारची घटना घडल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.



