Kukadi Water Release Cycle : कुकडी आवर्तनातून कर्जत तालुक्यातील २५ तलावांना पाणी;  तालुका प्रशासनाकडून आवाहन

पलब्ध पाण्याचा वापर फक्त पिण्यासाठी करण्याचे आवाहन

0
Kukadi Water Release Cycle : कुकडी आवर्तनातून कर्जत तालुक्यातील २५ तलावांना पाणी; तालुका प्रशासनाकडून आवाहन
Kukadi Water Release Cycle : कुकडी आवर्तनातून कर्जत तालुक्यातील २५ तलावांना पाणी; तालुका प्रशासनाकडून आवाहन

Kukadi Water Release Cycle : कर्जत : कुकडी आवर्तनातून (Kukadi Water Release Cycle) कर्जत तालुक्यातील एकूण २५ तलावात पाणी सोडण्यात आले असून या उपलब्ध पाण्याचा वापर सर्वसामान्य नागरिकांनी काटकसरीने करावा. तसेच सोडण्यात आलेल्या पाण्याचा कोणी ही अवैध उपसा करू नये, असे आवाहन तालुका प्रशासनाकडून (Taluka Administration) प्रांताधिकारी नितीन पाटील (Nitin Patil) यांनी केले आहे.

नक्की वाचा : इतिहास जगलेला आवलिया भूषण देशमुख

Kukadi Water Release Cycle : कुकडी आवर्तनातून कर्जत तालुक्यातील २५ तलावांना पाणी;  तालुका प्रशासनाकडून आवाहन
Kukadi Water Release Cycle : कुकडी आवर्तनातून कर्जत तालुक्यातील २५ तलावांना पाणी; तालुका प्रशासनाकडून आवाहन

उपलब्ध पाण्याचा वापर फक्त पिण्यासाठी करण्याचे आवाहन

सध्या कर्जत तालुक्यात कुकडीचे आवर्तन (पिण्याच्या पाणीसाठी) सुटलेले असून सर्वसामान्य नागरिकांच्या मागणीनुसार कर्जत तालुक्यातील एकूण २५ तलाव, बंधारे यासह ओढ्यात सोडलेले असून या उपलब्ध पाण्याचा वापर फक्त पिण्यासाठी करावा असे आवाहन तालुका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

Kukadi Water Release Cycle : कुकडी आवर्तनातून कर्जत तालुक्यातील २५ तलावांना पाणी;  तालुका प्रशासनाकडून आवाहन
Kukadi Water Release Cycle : कुकडी आवर्तनातून कर्जत तालुक्यातील २५ तलावांना पाणी; तालुका प्रशासनाकडून आवाहन

या २५ तलावांना सोडण्यात आले पाणी (Kukadi Water Release Cycle)

कर्जत तालुक्यातील चिलवडी, देशमुखवाडी, बेनवडी, कोळवडी, चापडगाव,  चापडगाव गावठाण विहीर लगत बंधारा, गलांडवाडी पाझर तलाव, लोणी मसदपूर बंधारा, कोरेगाव (रजपुतवाडी), पाटेवाडी पाझर तलाव,  धांडेवाडी बंधारा, नेटकेळवाडी, कोरेगाव, बजरंगवाडी, खातगाव बंधारा, लोणी मसदपूर पाणी पुरवठा विहीर लागत बंधारा (नदी), कर्जत शहर लगत बंधारा, आंबीजळगाव,अळसुंदा, माळंगी, डोंबाळवाडी, शेगुड, थेरवडी, दूरगाव पाझर तलाव आणि पळस-ओढा अशा जवळपास २५ पाझर तलाव, बंधारे आणि ओढ्यात मागणीनुसार पाणी सोडण्यात आले असून या उपलब्ध पाण्याचा सर्वसामान्य नागरिकांनी मान्सून सक्रिय होईपर्यंत काटकसरीने वापर करावा. तसेच सोडण्यात आलेल्या पाण्याचा कोणी ही अवैध उपसा करू नये, असे देखील आवाहन प्रांताधिकारी नितीन पाटील यांनी केले आहे.