नगर : देशातील अत्यंत लोकप्रिय अशा गणपती बाप्पा म्हणजे लालबागचा राजा. (Lalbaugcha Raja 2026) या बाप्पाच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक येत असतात. मात्र मुंबईत आलेल्या एका २५ वर्षीय तरुणाची दर्शनाची आस अखेरची ठरली आहे. मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाच्या दर्शनाला पुण्याहून आलेल्या एका तरुण भाविकाचा मृत्यू (Death of a young devotee) झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. जयदीप मेघराज नेमाडे (Jaydeep Nemade) असे मृत्यू पावलेल्या तरूणाचे नाव आहे.
नक्की वाचा : दारूचे व्यसन ठरले जीवघेणे! श्रीरामपुरात सख्ख्या लहान भावाने केली मोठ्याची हत्या
नेमकं काय घडलं? (Lalbaugcha Raja 2026)
जयदीप हा यंदाही दरवर्षीप्रमाणे लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी मित्रांसोबत मुंबईला आला होता. रांगेत उभे असताना त्याला अस्वस्थ वाटू लागले आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्रास सुरू झाल्याचे त्याने आपल्या मित्राला सांगितले आणि ते सर्वजण रांगेतून बाहेर पडले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी त्याला तात्काळ मदत कक्षात नेले आणि रुग्णवाहिकेने हलवले. मात्र उपचारापूर्वीच त्याला मृत घोषित केले. प्राथमिक माहितीनुसार, त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. काळाचौकी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ही घटना १७ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे ११.४० वाजता घडली.
हेही पहा : नगरच्या झेडपी सोसायटीत सुकामेव्यात साकारले बाप्पा!
जयदीप नेमका कोण? (Lalbaugcha Raja 2026)
जयदीप मेघराज मेघराज नेमाडे हा जळगाव जिल्ह्यातील शिरसोली रोडवरील जीवनमोती सोसायटीतील रहिवासी होता. त्याचे वडील मेघराज सुभाष नेमाडे हे नेमाडे ट्रान्सपोर्टचे संचालक आहेत. जयदीप कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. त्याच्या आईचे १२ वर्षांपूर्वी निधन झाले होते. जयदीप हा मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि एमबीएचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर जयदीप पुण्यात नोकरी करत होता. त्याच्या अचानक जाण्याने कुटुंबावर शोककळा पसरली आहे.



