Illegal Gas Refilling : अवैध गॅस रिफिलिंगचा काळाबाजार उघड; 133 गॅस टाक्यांसह 21 लाख 80 हजारांचा मुद्देमाल जप्त

Illegal Gas Refilling : अवैध गॅस रिफिलिंगचा काळाबाजार उघड; 133 गॅस टाक्यांसह 21 लाख 80 हजारांचा मुद्देमाल जप्त

0
Illegal Gas Refilling : अवैध गॅस रिफिलिंगचा काळाबाजार उघड; 133 गॅस टाक्यांसह 21 लाख 80 हजारांचा मुद्देमाल जप्त
Illegal Gas Refilling : अवैध गॅस रिफिलिंगचा काळाबाजार उघड; 133 गॅस टाक्यांसह 21 लाख 80 हजारांचा मुद्देमाल जप्त

Illegal Gas Refilling : नगर : घरगुती गॅस टाक्यांमधून (Domestic gas cylinders) व्यावसायिक गॅस टाक्यांमध्ये बेकायदेशीररीत्या गॅस रिफिलिंग (Illegal Gas Refilling) करून त्याची विक्री करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने (Local Crime Branch) पर्दाफाश केला. या कारवाईत 133 भरलेल्या व रिकाम्या घरगुती आणि व्यावसायिक गॅस टाक्यांसह एकूण 21 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले असून, मुख्य सूत्रधारासह अन्य एक संशयित फरार आहे. तर कल्ला रघुराज सिंग (वय 24, रा. गजानन कॉलनी, एमआयडीसी, बोल्हेगाव), गौरव राजेंद्र आढाव (वय 34, रा. आढाववाडी, पिंपळगाव माळवी) यांना ताब्यात घेण्यात आले.

पोलिसांनी पंचांसमक्ष टाकला छापा

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्यांची माहिती घेत असताना तपोवन रोड परिसरातील दक्षतानगर येथे बेकायदेशीर गॅस रिफिलिंग सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी संबंधित ठिकाणी पंचांसमक्ष छापा टाकला. यावेळी दोन इसम घरगुती गॅस टाकीला इलेक्ट्रिक मोटार जोडून वजनकाट्यावर ठेवून रिफिलिंग करताना आढळून आले.
पोलिसांनी त्यांच्याकडे गॅस टाक्यांचा वापर आणि रिफिलिंगसाठी आवश्यक परवान्याबाबत विचारणा केली असता कोणताही परवाना नसल्याचे त्यांनी सांगितले. या कारवाईत कल्ला रघुराज सिंग (वय 24, रा. गजानन कॉलनी, एमआयडीसी, बोल्हेगाव), गौरव राजेंद्र आढाव (वय 34, रा. आढाववाडी, पिंपळगाव माळवी) यांना ताब्यात घेण्यात आले.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

दोघे संशयीत सध्या पसार (Illegal Gas Refilling)

चौकशीदरम्यान हा व्यवसाय किरण संतोष गलांडे (रा. दक्षतानगर, तपोवन रोड, अहिल्यानगर) याच्या मालकीचा असल्याची माहिती ताब्यातील आरोपींनी पोलिसांना दिली. तसेच रिफिलिंगसाठी लागणाऱ्या घरगुती गॅस टाक्या नितीन कदम (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही, रा. पाइपलाइन रोड, अहिल्यानगर), याच्याकडून खरेदी केल्याचेही त्यांनी सांगितले. किरण गलांडे आणि नितीन कदम हे दोघे सध्या पसार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी केलेल्या कारवाईत भारत गॅस कंपनीच्या 56 भरलेल्या घरगुती, 46 भरलेल्या व्यावसायिक आणि दोन रिकाम्या घरगुती गॅस टाक्या, तसेच एचपी गॅस कंपनीच्या 23 भरलेल्या घरगुती, तीन भरलेल्या व्यावसायिक आणि तीन रिकाम्या व्यावसायिक गॅस टाक्या जप्त केल्या. याशिवाय दोन इलेक्ट्रिक मशीन, दोन इलेक्ट्रिक वजनकाटे, चार चाकी वाहने, एक पिकअप, एक कार, गॅस टाक्यांना सील बसविण्यासाठी वापरण्यात येणारे हिट गन मशीन, 30 गॅस टोपण व प्लास्टिक लेबल असा एकूण 21 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.


ताब्यात घेतलेल्या आरोपींना जप्त मुद्देमालासह तोफखाना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे व पोलीस अंमलदार गणेश धोत्रे, प्रताप देवकाते, मनोज साखरे, अमोल कोतकर यांच्या पथकाने केली आहे.