शेतकरी सुखी-समाधानी होऊ दे, पावसासाठी श्री गणेशाकडे साकडे
Shri Vishal Ganpati Temple : अहिल्यानगर : अहिल्यानगर शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिर (Shri Vishal Ganpati Temple) हे भाविकांचे श्रद्धास्थान असून, गणेशोत्सवानिमित्त (Ganeshotsav) मंदिरात धार्मिक वातावरणात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गणेशोत्सवानिमित्त आमदार संग्राम जगताप (MLA Sangram Jagtap) यांच्या हस्ते श्री विशाल गणपतीची भक्तिभावाने व मंगलमय वातावरणात महाआरती करण्यात आली.
शेतकरी सुखी-समाधानी होऊ दे, अशी प्रार्थना
यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी श्री विशाल गणपतीच्या चरणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडू दे, शेतकरी सुखी-समाधानी होऊ दे, अशी प्रार्थना केली. सध्या पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे. हवामान खात्याचे अंदाजही अनेकदा चुकत असून, त्यामुळे शेतकऱ्यांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर श्री विशाल गणपतीकडे पावसासाठी साकडे घातल्याचे त्यांनी सांगितले.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
आमदार संग्राम जगताप म्हणाले की, (Shri Vishal Ganpati Temple)
श्री विशाल गणपती मंदिर हे अहिल्यानगर शहराचे ग्रामदैवत असून, दररोज मोठ्या संख्येने भाविक देवदर्शनासाठी येथे येत असतात. गणेशोत्सवाच्या काळात देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून विविध धार्मिक, आध्यात्मिक तसेच समाजोपयोगी उपक्रम राबवून ते गरजू नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम केले जाते.

श्री विशाल गणपती मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम ट्रस्टच्या माध्यमातून सुरू असून, मंदिर परिसराच्या सुशोभीकरणासह विकासकामेही सुरू आहेत. या परिसराच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असून, या विकासकामांमध्ये नगरवासीयांचे मोठे योगदान आहे. श्री विशाल गणपतीच्या आशीर्वादाने या ठिकाणी चांगले कार्य सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
ट्रस्टच्या माध्यमातून धार्मिक कार्यासोबतच आरोग्य तपासणीसह विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जात आहेत. याच अनुषंगाने गणेशोत्सवानिमित्त दंतचिकित्सा शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. मंदिरात झालेल्या महाआरतीच्या धार्मिक सोहळ्यामुळे मन प्रसन्न झाल्याचे आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले. नगरवासीयांनी आनंदाने व मोठ्या उत्साहात पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहनही आमदार संग्राम जगताप यांनी केले.
गणेशोत्सवानिमित्त श्री विशाल गणपती मंदिरात झालेल्या महाआरतीप्रसंगी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ॲड. अभय आगरकर, पंडित खरपुडे, अशोक कानडे, ज्ञानेश्वर रासकर, प्रा. माणिकराव विधाते, नितीन पुंड, विजय कोथंबीर आदींसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



