लिटिल फ्लॉवरमध्ये शिक्षण व संस्कारांचा संगम: महापौर ज्योतीताई गाडे
Little Flower Pre-School : नगर : मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी प्री स्कूलपासूनच त्यांना चांगले शिक्षण आणि संस्कार मिळावे यासाठी विशेष प्रयत्न करणाऱ्या आणि नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या लिटिल फ्लॉवर प्री स्कूलची (Little Flower Pre-School) चौथी शाखा गुलमोहोर रोडवरील नवले नगर परिसरात नवीन शैक्षणिक वर्षात खुली झाली आहे. पालक वर्गाच्या आग्रहास्तव जास्तीत जास्त चिमुरड्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण मिळावे या उद्देशाने या नवीन शाखेचा शुभारंभ करण्यात आला.

उद्घाटन प्रसंगी उपस्थिती
या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी महापौर ज्योतीताई गाडे (Mayor Jyoti Gade), नगरसेविका गौरीताई बोरकर, नगरसेवक ऋग्वेद गंधे, माजी उपमहापौर गणेश भोसले, नगरसेवक प्रकाश भागानगरे, बाकलीवाल फौडेशन ट्रस्टचे सीए कमल बाकलीवाल, शाळेच्या संचालिका मनिषा बोगावत (Manisha Bogawat), विशाल बोगावत आदी उपस्थित होते.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
महापौर ज्योतीताई गाडे यांनी केले कौतुक (Little Flower Pre-School)
महापौर ज्योतीताई गाडे, नगरसेविका गौरीताई बोरकर यांनी लिटिल फ्लॉवर प्री स्कूलच्या तीनही शाखांचे कौतुक केले. या प्री स्कूलमध्ये मुलांना हसतखेळत शिक्षणाची गोडी लावली जाते. संस्कार, नीतिमूल्यांचे बिजारोपण केलं जाते. त्यामुळे भविष्यात सक्षम विद्यार्थी घडण्यास मदत होते. चौथ्या शाखेतूनही हीच चांगल्या शिक्षणाची परंपरा जपली जाईल अशा शब्दांत त्यांनी शुभेच्छा दिल्या.
ऋग्वेद गंधे म्हणाले, मनिषा बोगावत अनेक वर्षांपासून सुसंस्कृत पिढी घडविण्याचे काम करत आहेत. याठिकाणी मुलांना खूप कमी वयात शिक्षणाची आवड निर्माण होते. त्यांचे कलागुण विकसित होतात. अतिशय सुरेख उपक्रम राबविण्यात येत असल्याने देशाचे सुजाण नागरिक घडण्यास मदत होते.
गणेश भोसले म्हणाले, बोगावत दाम्पत्य समर्पित भावनेने शिक्षण क्षेत्रात योगदान देत आहेत. त्यांची प्रत्येक शाखा आदर्शवत आहे. ते जिथे जातात तिथे आपल्या कार्याचा ठसा उमटवून प्रभागाची शान वाढवतात.

प्रकाश भागानगरे म्हणाले, शहरातील इमारत कंपनी येथून सुरू झालेल्या लिटिल फ्लॉवरचा शहराच्या विविध भागात विस्तार होत आहे. चांगल्या वातावरणात मुलं आनंददायी शिक्षण घेत असल्याने पालकही विश्वासाने मुलांना येथे प्रवेश घेऊन देतात.
उपस्थित पालकांनी लिटिल फ्लॉवर प्री स्कूलच्या चौथ्या शाखेचे स्वागत करून सर्व टिमला शुभेच्छा दिल्या.
मनिषा बोगावत म्हणाल्या, लिटिल फ्लॉवर प्री स्कूलच्या प्रत्येक शाखेला पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय आहे. त्यामुळेच शाखा विस्तार केला आहे. या नवीन शाखेतही विविध उपक्रम राबविण्यात येतील. प्रत्येक मुलाच्या जडणघडणीवर विशेष लक्ष दिले जाईल. याठिकाणी २२ जून पासून सायंकाळी ५ ते ६.३० यावेळेत इव्हिनिंग फन पॉइंट सुरू होत आहे. यात मुलांना डान्स, म्युझिक, योग प्राणायाम, ट्रेकिंग, चित्रकला, मैदानी खेळ शिकवले जातील. जास्तीत जास्त पालकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. शेवटी विशाल बोगावत यांनी आभार मानले.



