Shrigonda : श्रीगोंद्यात काळ्या काचा व वाहतूक नियम तोडणाऱ्या ८६ वाहनचालकांवर कारवाई; दीड लाखांचा दंड वसूल

0
Shrigonda : श्रीगोंद्यात काळ्या काचा व वाहतूक नियम तोडणाऱ्या ८६ वाहनचालकांवर कारवाई; दीड लाखांचा दंड वसूल
Shrigonda : श्रीगोंद्यात काळ्या काचा व वाहतूक नियम तोडणाऱ्या ८६ वाहनचालकांवर कारवाई; दीड लाखांचा दंड वसूल

Shrigonda : नगर : श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध पोलिसांनी धडक कारवाई सुरू ठेवली असून काल (ता. १६) विविध प्रकारच्या वाहतूक नियमभंगाच्या एकूण ८६ केसेस करण्यात आल्या. या कारवाईत एकूण १ लाख ४२ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

हेही वाचा : पुणे जंक्शनच्या आधुनिकीकरणाचा रेल्वे मंत्र्याच्या हस्ते शुभारंभ; प्रवाशांना मिळणार अत्याधुनिक सुविधा

या वाहनांवर कारवाई

वाहतूक पोलिसांनी विशेषतः वाहनांवरील काळ्या काचा (ब्लॅक फिल्म) हटविण्याची मोहीम तीव्र केली असून, अशा २१ वाहनांवर कारवाई करून १३ हजार ५०० रुपयांचा दंड आकारण्यात आला. तसेच वाहन चालविताना परवाना नसलेल्या २९ जणांविरुद्ध कारवाई करून तब्बल ८९ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. याशिवाय विनाहेल्मेट वाहन चालविणाऱ्या ४ जणांवर ४ हजार रुपये, ट्रिपल सीट वाहन चालविणाऱ्या ३ जणांवर ३ हजार रुपये, सीट बेल्ट न लावणाऱ्या ४ वाहनचालकांवर ४ हजार रुपये दंड आकारण्यात आला. तसेच विनानंबर वाहन चालविणाऱ्या २७जणांकडून १९ हजार ५०० रुपये, तर नो पार्किंगमध्ये वाहने उभी करणाऱ्या ६ जणांकडून ६ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

नक्की पहा : पुणे जंक्शनच्या आधुनिकीकरणाचा रेल्वे मंत्र्याच्या हस्ते शुभारंभ; प्रवाशांना मिळणार अत्याधुनिक सुविधा

नियमांचे पालन करा (Shrigonda)

ही कारवाई पोलीस अधीक्षक र मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस म अधीक्षक वैभव कलूबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने तसेच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वाहतूक शाखेतील पोलीस कॉन्स्टेबल आजिनाथ जाधव आणि स गोरख जाधव यांनी ही कारवाई प्रभावीपणे पार पाडली. वाहतूक नियमांचे पालन करून सुरक्षित प्रवास करावा, असे आवाहन श्रीगोंदा पोलिसांकडून करण्यात आले आहे.