Little girl dies of electric shock : विजेच्या धक्क्याने साडेतीन वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

Little girl dies of electric shock : विजेच्या धक्क्याने साडेतीन वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

0
Little girl dies of electric shock : विजेच्या धक्क्याने साडेतीन वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
Little girl dies of electric shock : विजेच्या धक्क्याने साडेतीन वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

Little girl dies of electric shock : नगर : अहिल्यानगर शहरातील स्टेशन रस्त्यावरील आनंद नगर परिसरात सोमवारी सकाळी घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने (Heart-wrenching incident) संपूर्ण परिसर शोकसागरात बुडाला. विजेचा धक्का (Electric shock) लागल्याने अवघ्या साडेतीन वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू (Little girl dies of electric shock) झाला. सकाळी साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली असून, या घटनेनंतर परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर

मिळालेल्या माहितीनुसार, चिमुकली परिसरात असताना तिला विजेचा धक्का बसला. गंभीर अवस्थेत तिला तत्काळ उपचारासाठी नेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे समोर आले. खेळण्या-बागडण्याच्या वयातच काळाने या निष्पाप जीवाला हिरावून नेल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. परिसरातील नागरिकांनाही या घटनेने मोठा धक्का बसला असून, सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

निवेदने देऊनही कार्यवाही नसल्याचा आरोप(Little girl dies of electric shock)

या दुर्घटनेनंतर संतप्त नागरिकांनी महावितरण प्रशासनाच्या हलगर्जीपणावर गंभीर आरोप केले आहेत. परिसरातील धोकादायक विद्युत समस्यांबाबत वारंवार निवेदने देऊनही कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आली नाही, असा आरोप नागरिकांनी केला. वेळेत आवश्यक दुरुस्ती आणि सुरक्षिततेच्या उपाययोजना केल्या असत्या, तर ही दुर्घटना टळू शकली असती, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.

घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. दरम्यान, या प्रकरणात जबाबदारी निश्चित करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.