Mahabaleshwar and Panchgani closed:मोठी बातमी! महाबळेश्वर, पाचगणी पर्यटकांसाठी २ महिने बंद

0
Mahabaleshwar and Panchgani closed:मोठी बातमी! महाबळेश्वर, पाचगणी पर्यटकांसाठी २ महिने बंद
Mahabaleshwar and Panchgani closed:मोठी बातमी! महाबळेश्वर, पाचगणी पर्यटकांसाठी २ महिने बंद

नगर : सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर (Mahabaleshvar)आणि पाचगणी (Pachgani) ही थंड हवेची ठिकाणं फक्त राज्यातीलच नाही तर जगभरातील पर्यटकांची आकर्षणाची केंद्र आहेत. कोणत्याही ऋतूमध्ये येथे पर्यटकांची गर्दी असते. त्यातच आता पावसाळ्याला सुरु झाला आहे. मात्र पावसाळ्यात ही पर्यटनस्थळे दोन महिने (Two Months closed) म्हणजेच १९ ऑगस्टपर्यंत बंद राहणार आहेत.

नक्की वाचा : बापरे! कोल्हापूरातील धार्मिक संस्थेत अल्पवयीन विद्यार्थ्याची शॉक देऊन हत्या
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागात जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे काही पर्यटन स्थळांवर जाणाऱ्या पर्यटकांना देखील सावधगिरीची सूचना देण्यात आली आहे.  तसेच ज्या धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढलाय त्या भागातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सातारा जिल्ह्यातही जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध आणण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे.

अवश्य वाचा : सरकारच्या छुप्या मार्गानं भाषा शिकवण्याला बळी पडू नका ; राज ठाकरेंच मुख्याध्यापकांना आवाहन 

‘या’ कारणामुळे प्रशासनाने घेतला निर्णय (Mahabaleshwar and Panchgani closed)

महाबळेश्वर आणि पाचगणी प्रमाणे सातारा जिल्ह्यातील ही सर्व पर्यटन स्थळ देखील चांगलीच लोकप्रिय आहेत. विशेषत: पावसाळ्यात धबधब्याचा आनंद घेण्यासाठी इथं पर्यटकांची गर्दी होत असते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासनानं हा निर्णय घेतला आहे. मात्र प्रशासनाच्या या निर्णयामुळे सर्व खबरदारी घेऊन निसर्गाचा आनंद घेण्यासाठी सातारा जिल्ह्यात जाणाऱ्या पर्यटकांची चांगलीच निराशा होणार आहे. त्याचबरोबर पर्यटनावर अवलंबून उद्योगांवरही परिणाम होणार आहे.

कोणते पर्यटनस्थळ बंद राहणार ?(Mahabaleshwar and Panchgani closed)

सातारा जिल्ह्यात खालील प्रमुख पर्यटन स्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध राहणार आहेत.

अजिंक्यतारा किल्ला
ठोसेघर धबधबा
केळवली-सांडवली धबधबा
वजराई धबधबा
कास पुष्प पठार
एकीव धबधबा
कास तलाव
बामणोली
पंचकुंड धबधबा
सडावाघापूर उलटा धबधबा
ऊरुल घाट शिव मंदिर धबधबा
रुद्रेश्वर देवालय धबधबा
ओझर्डे धबधबा
घाटमाथा धबधबा
लिंगमळा धबधबा