Manoj Jarange Patil : मनाेज जरांगेंच्या जीवाला धाेका; विषप्रयाेग हाेण्याची शक्यता; ‘या’ नेत्याने केला खळबळजनक दावा

 Manoj Jarange Patil : मराठा आंदाेलक मनाेज जरांगे पाटील १० फेब्रुवारीपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपाेषणाला बसले आहे.

0
Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil : नगर : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी मनाेज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यावर विषप्रयाेग हाेऊ शकताे, असा खळबळजनक दावा केला आहे.  मनोज जरांगे यांना दिली जाणारी औषधं, सलाईन, इंजेक्शन आणि जेवण तपासून द्या, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. मनोज जरांगे यांच्यामुळे अनेकांचं राजकीय भवितव्य धोक्यात आल्याने त्यांच्या घातपाताची शक्यता (Chances of an accident) असल्याचंही ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाले आहेत.

Manoj Jarange Patil

हेही वाचा : नगरमधील साडेबारा एकर भूखंडाला आणखी वेगळे वळण

…तर आंदाेलनाची दिशा बदलणार (Manoj Jarange Patil)

 मराठा आंदाेलक मनाेज जरांगे पाटील १० फेब्रुवारीपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपाेषणाला बसले आहे. मराठा बांधवांच्या आग्रहामुळे त्यांनी औषधाेपचार सुरू केला आहे. २० फेब्रुवारी सरकारने मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बाेलवले आहे. यात सगेसाेयऱ्याचा कायदा लवकरात-लवकर पारित करावा, अशी मागणी मनाेज जरांगे पाटील यांची आहे. २० फेब्रुवारीपर्यंत कायदा पारित न झाल्यास आंदाेलनाची दिशा बदलण्याचा इशाराही जरांगे यांनी सरकारला दिला आहे. 

Manoj Jarange Patil

अवश्य वाचा : मराठा आरक्षणावर २० फेब्रुवारीला विशेष अधिवेशन; मुख्यमंत्री शिंदेंनी मांडली भूमिका

आंबेडकरांचा सल्ला (Manoj Jarange Patil)

Manoj Jarange Patil

 दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी टोकाचं पाऊल घेतलं असल्याचं दिसत आहे. त्यांना जी काही औषधं, सलाईन, जेवणं, ज्यूस दिला जात आहे, ते आधी तपासलं जावं. यानंतरच त्यांना या गोष्टी दिल्या जाव्यात. राज्य सरकार अशी व्यवस्था करेल, अशी अपेक्षा मी करत आहे,” असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. याआधीही प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे यांना १० ते १५ लोकांमध्ये बसून जेवण करू नये, असा सल्ला दिला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here