नगर : सरकार सध्या गुंडगिरीच्या भूमिकेत आहे, अशी टीका मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी केली आहे. दिल्ली पोलिसांनी आज कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके (Abhijit Deepke), आशुतोष रांका आणि सौरभ दास यांचे विमान दिल्ली विमानतळावर पोहोचताच थेट विमानात जाऊन अटक केली आहे. त्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली. जालन्यात (jalna)ते पत्रकारांशी बोलत होते.
नक्की वाचा : ध्रुव राठीसह अभिजीत दिपकेंना पोलिसांनी घेतलं ताब्यात? नेमकं काय घडलं?
‘सरकारला आंदोलन मोडून काढायचंय’ (Manoj Jarange Patil)
ते म्हणाले की, सरकारला मनमानी करायची आहे. त्यांना दादागिरीने लोकशाही मार्गाने होणारे आंदोलन मोडून काढायच आहे. सरकार म्हणेल त्या पद्धतीने आंदोलन चालले पाहिजे, या भूमिकेत सध्या सरकार आहे. सरकारला विद्यार्थ्यांचे आणि गोरगरीब जनतेचे प्रश्न सोडवायचे नाहीत. अभिजीत दीपकेंना अटक करणे म्हणजे सरकारला आंदोलन मोडून काढायचंय असा, आरोपही जरांगेंनी केला आहे.
अवश्य वाचा : रहस्य आणि स्त्रीशक्तीचा संगम; ‘दशमी’च्या गाण्यात दिसणार गौरी इंगवलेचा रौद्र अवतार
दिल्लीत नेमकं काय घडलं? (Manoj Jarange Patil)
दीपके, सौरभ दास आणि आशुतोष रांका हे जंतर-मंतरवर आंदोलन करण्यासाठी मुंबईहून दिल्लीला निघाले होते. ते विमानाने दिल्लीत पोहोचताच दिल्ली पोलिसांनी विमानातूनच त्यांना ताब्यात घेतले. विशेष म्हणजे, ते विमानतळावर पोहोचताच पोलिसांनी त्यांना थेट विमानातूनच ताब्यात घेतल्याचा व्हिडीओ समोर आलाय. दिपके आणि त्यांच्या साथीदारांना ताब्यात घेण्यासाठी महिला पोलीस कर्मचाऱ्यांना पाठवण्यात आले होते. विमानातील सर्व घडामोडीचे लाईव्ह सीजीपीद्वारे करण्यात आले आहे.



