नगर : मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मुद्यावरुन पुन्हा एकदा राज्यातील वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे पुन्हा एकदा २९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटीत आंदोलनाला सुरुवात करणार आहेत. त्यापूर्वी सरकाराने मराठा कुणबी प्रमाणपत्रासंदर्भात एक मोठं पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे. कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्रासाठीच्या वंशावळ जुळवणी समितीला आणखी एक वर्षाची मुदतवाढ (Committee granted a one-year extension) देण्यात आली आहे.
नक्की वाचा : ‘मिस युनिव्हर्स इंडिया २०२६’ मधील उर्वशी रौतेलाचा ‘तिरंगा लूक’ वादाच्या भोवऱ्यात; कायदा काय सांगतो?
प्रमाणपत्र मिळणार का? (Maratha Reservation)
मिळालेल्या माहितीनुसार, कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्रासाठी वंशावळ जुळवण्याच्या प्रक्रियेसाठी तालुकास्तरावर तहसिलदारांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीला मुदतवाढ देण्यात आली आहे. १ जुलै २०२६ ते ३० जून २०२७ पर्यंत या समितीचा कार्यकाळ वाढवला आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये वंशावळ जुळवणीचे काम अजून पूर्ण न झाल्याने शासनाने हा निर्णय घेतल्याची माहिती आहे. त्यामुळे आता मराठा कुणबी प्रमाणपत्राचा मार्ग सुकर होणार का? असा देखील प्रश्न विचारला जातोय. तर अपूर्ण जुळवणी त्वरित पूर्ण करण्याचे निर्देश देखील यावेळी देण्यात आले आहे.
अवश्य वाचा : MPSC भरतीबाबत उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; १०% जागा रिक्त ठेवण्याचे निर्देश
मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीला मुदतवाढ (Maratha Reservation)

नुकत्याच पार पडलेल्या मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीतील निर्देशानंतर समितीला मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती आहे. २५ ऑगस्ट २०२६ रोजी महाराष्ट्र शासनाने या संदर्भात शासन निर्णय जारी केला आहे. तर पूर्वी समितीचा कार्यकाळ ३० जून २०२६ रोजी संपला होता. आता आणखी एक वर्षासाठी मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती आहे.



