Mayor Jyoti Gade : गणेशोत्सव देखाव्यांतून संस्कृती, परंपरेचा वारसा जोपासला जातो – महापौर ज्योती गाडे

Mayor Jyoti Gade : गणेशोत्सव देखाव्यांतून संस्कृती, परंपरेचा वारसा जोपासला जातो - महापौर ज्योती गाडे

0
Mayor Jyoti Gade : गणेशोत्सव देखाव्यांतून संस्कृती, परंपरेचा वारसा जोपासला जातो - महापौर ज्योती गाडे
Mayor Jyoti Gade : गणेशोत्सव देखाव्यांतून संस्कृती, परंपरेचा वारसा जोपासला जातो - महापौर ज्योती गाडे

पाणी बचत, स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा – आयुक्त यशवंत डांगे

Mayor Jyoti Gade : अहिल्यानगर : अहिल्यानगर महानगरपालिकेच्या (AMC) वतीने आयोजित सार्वजनिक श्री गणेशोत्सव देखावा स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. महापौर ज्योतीताई गाडे (Mayor Jyoti Gade), उपमहापौर ॲड. धनंजय जाधव आणि आयुक्त यशवंत डांगे यांच्या हस्ते विजेत्या गणेश मंडळांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. टिळक रोड येथील लोकमान्य टिळक मित्र मंडळाने सादर केलेल्या खंडोबा-बानू विवाह सोहळ्याच्या देखाव्याला धार्मिक व आध्यात्मिक देखावे विभागात प्रथम क्रमांक मिळाला. मंडळाच्या सदस्यांनी वाजतगाजत आणि सनईच्या सुरेल निनादात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक स्वीकारले.
यावेळी ब्रिगेडियर राजीव चावला यांचा सीक्यूएव्ही परिसरात साडेतीन लाख देशी वृक्षांची लागवड केल्याबद्दल, तसेच राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत सुवर्णपदक मिळविल्याबद्दल दिया जासूद हिचा विशेष सत्कार करण्यात आला.

Mayor Jyoti Gade : गणेशोत्सव देखाव्यांतून संस्कृती, परंपरेचा वारसा जोपासला जातो - महापौर ज्योती गाडे
Mayor Jyoti Gade : गणेशोत्सव देखाव्यांतून संस्कृती, परंपरेचा वारसा जोपासला जातो – महापौर ज्योती गाडे

महापौर ज्योतीताई गाडे म्हणाल्या की,

लोकमान्य टिळक यांनी गणेशोत्सव सुरू करून समाजप्रबोधनाचे प्रभावी व्यासपीठ निर्माण केले. गणेशोत्सवातील देखाव्यांच्या माध्यमातून सांस्कृतिक, धार्मिक आणि ऐतिहासिक परंपरेचा वारसा जपण्याचे काम होत आहे. कोणताही देखावा एका रात्रीत निर्माण होत नाही. त्यामागे मंडळांच्या सदस्यांचे मोठे कष्ट आणि नियोजन असते. या देखाव्यांतून समाजाला सुंदर विचार देण्याचे काम केले जाते.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

विचारांचा वारसा पोहोचविण्यासाठी देखावे महत्त्वाची भूमिका (Mayor Jyoti Gade)

व्यसनमुक्ती, पर्यावरण संवर्धन, समाजात घडणाऱ्या सत्य घटना, छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास तसेच संत-महंतांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी गणेशोत्सवातील देखावे महत्त्वाची भूमिका बजावतात. आता गणेश मंडळांनी पुढाकार घेऊन समाजात पाणी बचतीबाबत जनजागृती करावी. आपल्यासमोर पाण्याचे मोठे संकट उभे आहे. प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून पाण्याची बचत करणे आवश्यक आहे.

Mayor Jyoti Gade : गणेशोत्सव देखाव्यांतून संस्कृती, परंपरेचा वारसा जोपासला जातो - महापौर ज्योती गाडे
Mayor Jyoti Gade : गणेशोत्सव देखाव्यांतून संस्कृती, परंपरेचा वारसा जोपासला जातो – महापौर ज्योती गाडे


आपण मोठ्या प्रमाणात झाडे नष्ट करून काँक्रीटची जंगले उभी करीत आहोत. त्यामुळे दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी होत चालले आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन ही काळाची गरज आहे. ब्रिगेडियर राजीव चावला यांनी सीक्यूएव्ही परिसरात साडेतीन लाख देशी वृक्षांची लागवड केली आहे. त्याचप्रमाणे उपमहापौर ॲड. धनंजय जाधव यांनीही पालकमंत्री ग्रीन सिटी मोहिमेच्या माध्यमातून वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाचे काम सुरू केले आहे. ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.


अहिल्यानगर शहरातील गणेश मंडळांनी यंदाच्या गणेशोत्सवात सुंदर देखावे सादर करून समाजप्रबोधनाचे काम केले आहे. त्यांच्या या कार्याचे कौतुक करून महानगरपालिकेच्या माध्यमातून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यात आली असल्याचे महापौर ज्योतीताई गाडे यांनी नमूद केले.


आयुक्त यशवंत डांगे म्हणाले की, गणेशोत्सवामध्ये शहरातील मंडळांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन उत्कृष्ट देखावे सादर केले आणि समाजप्रबोधनाचे काम केले. यापुढील काळातही असेच सामाजिक कार्य सर्वांनी मिळून करणे आवश्यक आहे. पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पाणी बचतीचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्याची गरज आहे. पुढील काळात वेळेवर पाऊस पडेल की नाही, हे सांगता येत नाही. त्यामुळे आतापासूनच पाणी बचतीची काळजी घ्यावी लागणार आहे. आपण ४० किलोमीटर अंतरावरून पाणी आणतो. पाणी ही दुर्मिळ गोष्ट असून एप्रिल आणि मे महिन्यात पाणीटंचाईची तीव्रता जाणवू शकते. त्यामुळे नागरिकांनी आतापासूनच पाण्याचा काटकसरीने वापर करावा.


शहरातील स्वच्छतेवर महानगरपालिकेच्या माध्यमातून सुमारे दहा कोटी रुपये खर्च केले जातात. नागरिकांनीही आपला परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी स्वीकारावी आणि घरातील कचरा घंटागाडीतच टाकावा. त्यामुळे आपले शहर स्वच्छ आणि सुंदर राहण्यास मदत होईल. शहरात २७ दवाखान्यांच्या माध्यमातून नागरिकांना आरोग्यसेवा दिली जाते. या दवाखान्यांमध्ये मोफत रक्ततपासणी केली जाते, तसेच औषधेही मोफत उपलब्ध करून दिली जातात. त्यामुळे गरजू नागरिकांनी या आरोग्यसेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
डेंग्यूमुक्त अहिल्यानगर अभियानाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली. त्यामुळे डेंग्यू आजारावर नियंत्रण मिळविण्यात यश आले असल्याचे आयुक्त डांगे यांनी सांगितले.


ब्रिगेडियर राजीव चावला म्हणाले की, सर्वांच्या सहकार्यातून सीक्यूएव्ही परिसरात सुमारे साडेतीन लाख देशी वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. या कामासाठी वन विभागाचे सहकार्य मिळाले. त्याचबरोबर मिस्किन परिवारानेही वृक्षांना पाणी देण्याचे काम केले. या उपक्रमामुळे अहिल्यानगर शहराचे प्रदूषण कमी होण्यास मदत होईल आणि पर्यावरणाचा समतोल राखला जाईल. या परिसरात पक्षी आणि फुलपाखरे येतील, तसेच हिरवीगार आणि सुंदर वसुंधरा निर्माण होण्यास हातभार लागेल.


विकसित भारत निर्माण करण्यासाठी सर्वांच्या योगदानाची खरी गरज आहे. पुढील पिढीच्या भविष्यासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे काम केले पाहिजे. महानगरपालिकेने केलेल्या सत्काराबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.


उपमहापौर अॅड. धनंजय जाधव म्हणाले की, गणेशोत्सव साजरा करणे ही नगर शहराची जुनी परंपरा आहे. श्री विशाल गणपती मंदिर हे शहराचे ग्रामदैवत असून सर्वजण एकत्रित येऊन मोठ्या उत्साहात हा उत्सव साजरा करतात. या उत्सवाच्या निमित्ताने सर्व गणेश मंडळांचे सदस्य एकत्र येतात आणि सामाजिक बांधिलकी जोपासत देखाव्यांच्या माध्यमातून समाजाला चांगला संदेश देतात.


गणेश मंडळांच्या माध्यमातून कार्यकर्ता घडतो. मी पूर्वी सिद्धेश्वर मित्र मंडळाचे बक्षीस घेण्यासाठी एक कार्यकर्ता म्हणून येत होतो. मात्र, गणरायाच्या आशीर्वादाने आज उपमहापौर पदावर काम करण्याची संधी मिळाली असून आता बक्षीस वितरण करण्याचा मान मिळत आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.


परीक्षक श्रेणिक शिंगवी म्हणाले की, यावर्षीचा गणेशोत्सव काहीसा वेगळा होता. यंदा जिवंत देखाव्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले, तर मूर्ती देखाव्यांचे प्रमाण तुलनेने कमी होते. शहरातील मित्र मंडळांनी डोळ्यांचे पारणे फेडणारे देखावे तयार केले होते. या देखाव्यांच्या माध्यमातून ३०० पेक्षा जास्त मुलांना रोजगार मिळाला आहे. यंदाचा गणेशोत्सव देखणा झाला असून प्रत्येक मित्र मंडळाने सामाजिक भान जपत समाजाप्रती असलेले आपले कर्तव्य पार पाडले, असे त्यांनी सांगितले.


धार्मिक व आध्यात्मिक देखावे विभागात प्रथम क्रमांक टिळक रोड येथील लोकमान्य टिळक मित्र मंडळाने सादर केलेल्या ‘खंडोबा-बानू विवाह सोहळा’ या देखाव्याला मिळाला. द्वितीय क्रमांक विभागून बंगाल चौकी मित्र मंडळाच्या ‘खंडोबा-बानू विवाह सोहळा’ आणि नवरत्न मित्र मंडळ, माळीवाडा यांच्या ‘सप्तशृंगीचा अवतार’ या देखाव्यांना मिळाला. तृतीय क्रमांक विभागून महालक्ष्मी मित्र मंडळ, माळीवाडा यांच्या ‘महालक्ष्मीची कथा’ आणि राजयोग प्रतिष्ठान, स्वस्तिक चौक यांच्या ‘खंडोबा-बानू विवाह सोहळा’ या देखाव्यांना मिळाला.


समाजप्रबोधनपर देखावे विभागात प्रथम क्रमांक बालाजी युवक मंडळ, मंगल गेट यांच्या ‘बदलाची सुरुवात आपल्यापासून’ या देखाव्याला मिळाला. द्वितीय क्रमांक विभागून वीर राजे मित्र मंडळ, सुगंधी चाळ यांच्या ‘बेटी बचाव’ आणि श्री कपिलेश्वर मित्र मंडळ ट्रस्ट यांच्या ‘मिशन भेसळमुक्त भारत’ या देखाव्यांना मिळाला. तृतीय क्रमांक विभागून स्वामी विवेकानंद तरुण मंडळ, स्नेहालय यांच्या ‘उडान – रस्ता बदलायला हवा, बालविवाह थांबवा, बालपण वाचवा’ आणि नवग्रह प्रतिष्ठान मित्र मंडळ, नेप्ती नाका यांच्या ‘महाराष्ट्र निर्मितीचे तीन आधारस्तंभ’ या देखाव्यांना मिळाला.


ऐतिहासिक व गडकिल्ले देखावे विभागात प्रथम क्रमांक शिवरद प्रतिष्ठान, पटवर्धन चौक यांच्या ‘शिवराज्याभिषेक’ या देखाव्याला मिळाला. द्वितीय क्रमांक सिद्धेश्वर मित्र मंडळ, जगु भाई तालीम यांच्या ‘बाजीप्रभू देशपांडे, वीर शिवा काशीद’ या देखाव्याला, तर तृतीय क्रमांक नंदनवन मित्र मंडळ यांच्या ‘युगत मांडली’ या देखाव्याला मिळाला.


सोशल मीडिया व आधुनिक तंत्रज्ञान देखावे स्पर्धेत प्रथम क्रमांक जय हिंद तरुण मंडळ, दवा बाजार, नांगरे गल्ली यांच्या ‘दशावतार’ या देखाव्याला मिळाला. द्वितीय क्रमांक बागडपट्टीचा राजा मित्र मंडळ यांच्या ‘सृष्टीची उत्पत्ती आणि विनाश’ या देखाव्याला, तर तृतीय क्रमांक शिवगर्जना प्रतिष्ठान यांच्या ‘गुप्तहेरगिरी ही स्वराज्याची ढाल’ या देखाव्याला मिळाला.


प्रबोधनपर, शिस्तबद्ध व पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढणाऱ्या मंडळांच्या विभागात प्रथम क्रमांक ग्रामदैवत श्री विशाल गणपती, माळीवाडा यांना मिळाला. द्वितीय क्रमांक विभागून तालयोगी, सावेडी आणि मोरया युवा प्रतिष्ठान, गुलमोहर रोड यांना मिळाला. तृतीय क्रमांक विभागून गोरक्षनाथ युवा प्रतिष्ठान, वैदुवाडी, सावेडी आणि लोकमान्य नगर मित्र मंडळ, भिस्तबाग चौक यांना मिळाला.
उत्कृष्ट रांगोळी स्पर्धेत रंग संस्कृती ग्रुप, अहिल्यानगर आणि सम्राट तरुण मंडळ, चितळे रोड यांचा गौरव करण्यात आला.


धार्मिक व आध्यात्मिक देखावे स्पर्धेत विशेष उत्तेजनार्थ पारितोषिकासाठी शेरकर गल्ली मित्र मंडळाच्या वतीने सादर करण्यात आलेले ‘बारा ज्योतिर्लिंग दर्शन’ आणि सिद्धिविनायक मित्र मंडळाच्या वतीने सादर करण्यात आलेला ‘तिरंगा चौक, फणसे मळा, सावेडी – कर्दळीवन’ या देखाव्यांची निवड करण्यात आली.


स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्यांना २५ हजार रुपये रोख आणि सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांकाच्या विजेत्यांना १५ हजार रुपये रोख आणि सन्मानचिन्ह, तर तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना १० हजार रुपये रोख आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.


कार्यक्रमास महापौर ज्योतीताई गाडे आयुक्त यशवंत डांगे उपमहापौर एडवोकेट धनंजय जाधव ब्रिगेडियर राजीव चावला, सभापती दीपालीताई बारस्कर, अमोल गाडे, नगरसेवक विकी जगताप, प्रकाश भागानगरे, मोहित पंजाबी, नगरसेविका आशाताई डागवले, उपायुक्त मेहर लहारे, उपायुक्त निखिल फराटे, सहाय्यक आयुक्त हरीकल्याण येलगट्टे, परीक्षक श्रेणिक शिंगवी, शशिकांत नजन, अभिजित दरेकर, आर्किटेक्ट अजय अपूर्वा, लहू दळवी आदींसह शहरातील विविध गणेश मंडळांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभासद आणि गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपेश पसपुल यांनी केले, तर आभार प्रदर्शन उपायुक्त मेहर लहारे यांनी केले.