Obscene Act in Gront of a Minor Girl : नगर : एका राजकीय पक्षाचे पारनेर तालुक्याचे माजी तालुकाध्यक्ष विक्रमसिंह बबनराव कमळकर याच्याविरोधात पारनेर पोलीस ठाण्यात विनयभंग, पोक्सो कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. यापूर्वी त्याच्याविरूध्द अत्याचाराचा गुन्हा दाखल करणाऱ्या विवाहित महिलेने फिर्याद दिली आहे. सदरचा प्रकार अहिल्यानगर शहर परिसरात घडल्याने सदरचा गुन्हा तपासकामी कोतवाली पोलिसांकडे प्राप्त झाला आहे. फिर्यादीच्या अल्पवयीन मुलीसमोर (वय ९) अश्लील कृत्य केल्याचा (Obscene Act in Gront of a Minor Girl) आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, यापूर्वी कळमकर याच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून सुपा पोलीस ठाण्यात संबंधित महिलेविरूध्द खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहे.
व्हिडिओ कॉल रेकॉर्ड केला
फिर्यादी महिलेने यापूर्वीच्या प्रकरणासंदर्भात विक्रमसिंह याचा व्हिडिओ कॉल रेकॉर्ड केलेला व्हिडिओ एका समाजसेविकेला दाखविला. त्यावेळी तिच्या नऊ वर्षांच्या मुलीनेही विक्रम काकांनी अशाच प्रकारे आपल्यासमोर कृत्य केल्याचे आईला सांगितले. जानेवारी २०२६ मध्ये अहिल्यानगर शहरातील एका उपनगरातील भाड्याच्या खोलीत हा प्रकार घडल्याचे मुलीने आईला सांगितले.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
अश्लिल कृत्यानंतर धमकी (Obscene Act in Gront of a Minor Girl)
विक्रमसिंह याने आपल्यासोबत अश्लिल कृत्य करून कोणाला काही सांगू नको, अशी धमकी दिली. त्यासाठी खाऊचे पैसेही दिल्याचे मुलीने आईला सांगितल्याचे फिर्यादीत नमूद आहे. मुलीने सांगितलेल्या या प्रकारानंतर आईने पारनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सदरचा प्रकार अहिल्यानगर शहर परिसरात घडल्याने तपासकामी सदरचा गुन्हा गुरूवारी (ता.१९) कोतवाली पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. कळमकर याच्याविरूध्द आणखी एक गुन्हा दाखल झाल्याने त्याच्या अडचणीत वाढ झाली आहे.



