MLA Amol Khatal : गरजू रुग्णांसाठी आमदार अमोल खताळ ठरले आधार

MLA Amol Khatal : गरजू रुग्णांसाठी आमदार अमोल खताळ ठरले आधार

0
MLA Amol Khatal : गरजू रुग्णांसाठी आमदार अमोल खताळ ठरले आधार
MLA Amol Khatal : गरजू रुग्णांसाठी आमदार अमोल खताळ ठरले आधार

सातत्यपूर्ण पाठपुरावा; ९८ रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून १ कोटींचे अर्थसहाय्य

MLA Amol Khatal : संगमनेर : संगमनेर मतदारसंघातील सर्वसामान्य, गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना (Financially weak patients) उपचारासाठी आर्थिक मदतीचा मोठा दिलासा मिळावा म्हणून आमदार अमोल खताळ (MLA Amol Khatal) यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री सहाय्यता निधी (Chief Minister’s Relief Fund) कक्षाच्या माध्यमातून मागील एका वर्षात ९८ रुग्णांना तब्बल १ कोटी रूपयांच्या आसपास वैद्यकीय अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे रूग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.

उपचारांसाठी अनेक कुटुंबांना मिळाला आर्थिक आधार

अत्यंत खर्चिक आणि गंभीर आजारांवरील उपचारांसाठी ही मदत मिळाल्याने अनेक कुटुंबांना आर्थिक आधार मिळाला आहे. या अर्थसहाय्यामध्ये रुग्णांना कर्करोग शस्त्रक्रिया, मेंदूचे आजार, हृदयरोग, डायलिसिस, कर्करोग (केमोथेरपी/रेडिएशन), गुडघ्याचे प्रत्यारोपण, नवजात शिशुंचे आजार, रस्ते अपघात तसेच इतर गंभीर आजारांच्या उपचारांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. ग्रामीण भागातील अनेक नागरिकांना शासनाच्या योजनांची माहिती नसते किंवा आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यात अडचणी येतात. अशा वेळी आमदार खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात गरजेची सर्व प्रक्रिया वेगाने पूर्ण करून दिली जात आहे. यामुळे रुग्णांना वेळेत उपचार घेणे शक्य झाले आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

शासकीय योजनांचा लाभ नागरिकांना उपलब्ध (MLA Amol Khatal)

उपचाराअभावी कोणत्याही रुग्णाला त्रास सहन करावा लागू नये, यासाठी शासनामार्फत महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना, आयुष्यमान भारत, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम किंवा धर्मादाय रुग्णालयांच्या योजनांचा लाभ नागरिकांना उपलब्ध करून दिला जात आहे. सर्व शासकीय योजनांचा लाभ जास्तीत जास्त गरजू नागरिकांपर्यंत पोहोचावा, यावर आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनुसार विशेष भर देण्यात येत आहे.

आजारपणामुळे सर्वसामान्य कुटुंबांवर आर्थिक संकट येते. अशा परिस्थितीत आर्थिक अडचणीमुळे उपचारात अडथळा येऊ नये, यासाठी शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून गरजू रुग्णांना वेळेत मदत मिळवून देण्याचा आमचा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे. रुग्णसेवेच्या या कार्यात मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्राताई पवार, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे विशेष सहकार्य मिळत आहे.

-अमोल खताळ (आमदार)