Molestation of a Minor Girl : धार्मिक सप्ताहात अल्पवयीन मुलीची छेडछाड; जाब विचारणाऱ्या मावस भावालाही मारहाण

Molestation of a Minor Girl : धार्मिक सप्ताहात अल्पवयीन मुलीची छेडछाड; जाब विचारणाऱ्या मावस भावालाही मारहाण

0

आरोपीच्या अटकेसाठी दोन पथके रवाना

Molestation of a Minor Girl : पाथर्डी : तालुक्यातील एका गावात सुरू असलेल्या धार्मिक सप्ताहादरम्यान १४ वर्षीय अल्पवयीन मुलीची छेडछाड (Molestation of a Minor Girl) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकाराचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या पीडितेच्या मावस भावालाही आरोपीने मारहाण (Assault) केल्याची घटना घडली. याप्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात (Pathardi Police Station) एका अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची दोन पथके रवाना करण्यात आली आहेत.

नक्की वाचा : अवैध माती उपसा करणाऱ्यांची महसूल पथकाला अरेरावी; ६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

हात पकडत मुलीची छेडछाड

मिळालेल्या माहितीनुसार, पाथर्डी शहरालगतच्या एका गावात धार्मिक सप्ताह सुरू असून २६ मे रोजी सायंकाळच्या सुमारास पीडित १४ वर्षीय मुलगी आपल्या आजीसोबत सप्ताह मंडपात उपस्थित होती. त्यावेळी गावातीलच एका अल्पवयीन मुलाने मुलीचा हात धरून तिची छेडछाड केली. या प्रकाराला मुलीने विरोध करत झाडूने मारण्याची भीती दाखवल्यानंतर आरोपी तेथून निघून गेला. मात्र दुसऱ्याच दिवशी म्हणजे २७ मे रोजी आरोपी पुन्हा सप्ताहाच्या ठिकाणी आला आणि पीडित मुलीला पैसे देण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

Molestation of a Minor Girl : धार्मिक सप्ताहात अल्पवयीन मुलीची छेडछाड; जाब विचारणाऱ्या मावस भावालाही मारहाण
Molestation of a Minor Girl : धार्मिक सप्ताहात अल्पवयीन मुलीची छेडछाड; जाब विचारणाऱ्या मावस भावालाही मारहाण

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

भावाला शिवीगाळ करत मारहाण (Molestation of a Minor Girl)

घडलेला प्रकार पीडितेने तिच्या मावस भावाला सांगितल्यानंतर २८ मे रोजी सकाळी संबंधित भावाने आरोपीला जाब विचारला. यावेळी आरोपीने शिवीगाळ करत त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यानंतरही आरोपीची दादागिरी सुरूच राहिली. २८ मे रोजी रात्री सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास सप्ताह मंडपात पीडित मुलीने आरोपीला तिच्या मावस भावाला दाखवले असता आरोपीने संतापून भावाची गचांडी धरून त्याला जमिनीवर ढकलले. “तू कोण लागून गेला?” असे म्हणत आरोपीने सार्वजनिक मंडपातच अल्पवयीन मुलीचा हात धरून तिला स्वतःकडे ओढल्याचे फिर्यादीत नमूद आहे. मावस भावाने विरोध केल्यानंतर आरोपीने मुलीचा हात सोडला.

या प्रकारानंतर पीडित मुलगी, तिचे वडील, नातेवाईक व ग्रामस्थ यांनी पाथर्डी पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पीडितेच्या फिर्यादीवरून आरोपी विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, गुरुवारी (ता. २८) रात्री हा गुन्हा दाखल झाल्यानंतर घटनेची माहिती परिसरात पसरताच हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यासमोर मोठी गर्दी केली. आरोपीला तत्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात आली. पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीच्या शोधासाठी दोन विशेष पथके विविध ठिकाणी रवाना करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.