First in the state: स्वच्छ व सुंदर बसस्थानक स्पर्धेत अकोले बसस्थानक राज्यात प्रथम

प्रशासनाशी समन्वय साधून विविध कामांना गती

0

First in the state:अकोले: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बसस्थानक स्पर्धेत” अकोले येथील छत्रपती शिवाजी महाराज बसस्थानकाने राज्यात प्रथम क्रमांक (First in the state) पटकावला आहे. या यशामुळे तालुक्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. स्वच्छता, प्रवाशांसाठी सुविधा, आकर्षक परिसर, नियोजनबद्ध व्यवस्थापन आणि सुशोभीकरण या निकषांवर अकोले बसस्थानकाने उत्कृष्ट कामगिरी करत राज्यात अव्वल स्थान मिळवले.

अवश्य वाचा- औरंगपूर प्रकरण तापले; माजी सैनिक संघटना आक्रमक

प्रशासनाशी समन्वय साधून विविध कामांना गती (First in the state)

बसस्थानक परिसरातील स्वच्छता, रंगरंगोटी, सुबक रचना आणि प्रवाशांसाठी करण्यात आलेल्या सुविधा यामुळे हे बसस्थानक विशेष आकर्षण ठरत आहे. या बसस्थानकाचा झालेला कायापालट हा आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या पुढाकारातून आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे शक्य झाल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. आमदार लहामटे यांनी बसस्थानकाच्या विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देत प्रशासनाशी समन्वय साधून विविध कामांना गती दिली होती. परिणामी हे बसस्थानक आधुनिक, स्वच्छ आणि सुंदर स्वरूपात प्रवाशांच्या सेवेत उभे आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल बसस्थानक प्रशासन, कर्मचारी व आमदार लहामटे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.