नगर: मान्सून संदर्भात सुखावणारी एक बातमी समोर आली आहे. केरळमध्ये मान्सून (Monsoon Alert) दाखल झाल्याची अधिकृत घोषणा भारतीय हवामान विभागाने (India Meteorological Department) केली. आता दक्षिण भारतातून हळूहळू वर सरकत लवकर मान्सून महाराष्ट्रासह देशाच्या इतर भागात पोहचण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे आजपासून राज्यात वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.
नक्की वाचा: LPG महागला, देशभरात आजपासून ५ मोठे बदल! वाचा सविस्तर…
मात्र हा मान्सून नसून मान्सूनपूर्व पावसाच्या सरी सध्या राज्यभरात कोसळत आहे. किमान १० जून पर्यंत राज्यातील बहुतांश भागात मान्सूनच्या आगमनाची शक्यता नाही. अशीही माहिती प्रादेशिक हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी दमदार पाऊस आणि अधिकृत माहिती मिळेपर्यंत शेतीतील पेरण्या न करण्याच्या सूचना कृषी विभागाकडून देण्यात आल्या आहे.
अवश्य वाचा: ‘प्राजक्त यांचा भाजप प्रवेश आमच्यासाठी धक्कादायक’ – जयंत पाटील
१० जून पर्यंत राज्यात मान्सूनच्या आगमनाची शक्यता नाहीच!

मिळालेल्या माहितीनुसार, विदर्भ, मराठवाडा, मध्यमहाराष्ट्र आणि खानदेशात दुपार नंतरचे ढग आणि काही प्रमाणात वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आगामी वादळी पावसाचा मान्सून शी काहीही संबंध नाही, कारण मान्सून केरळात पोहोचलेला असला तरी राज्यभरात पोहचायला त्याला काहीसा अवकाश आहे. सध्याच्या स्थितीनुसार राज्यातील बहुतांश भागांमध्ये किमान १० जून पर्यंत मान्सूनच्या आगमनाची शक्यता नाही. अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.



