Muharram Visarjan Miravnuk : मोहरम विसर्जन मिरवणुकीपूर्वी बॉम्बशोधक पथकाकडून मार्गाची पाहणी; शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त

Muharram Visarjan Miravnuk : मोहरम विसर्जन मिरवणुकीपूर्वी बॉम्बशोधक पथकाकडून मार्गाची पाहणी; शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त

0

Muharram Visarjan Miravnuk : नगर : शहरात आज होणाऱ्या मोहरम विसर्जन मिरवणुकीच्या (Muharram Visarjan Miravnuk) पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्थेचा आढावा (Review of Security Arrangements) घेत अहिल्यानगर बॉम्बशोधक व नाशक पथकाने (बीडीडीएस) (Ahilyanagar Bomb Detection and Disposal Squad (BDDS)) मिरवणूक मार्गाची सखोल पाहणी केली. मिरवणूक शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पडावी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी ही पाहणी करण्यात आली.

मिरवणूक मार्गावरील विविध ठिकाणांची तपासणी

या मोहिमेत बॉम्बशोधक पथकाचे पोलीस उपनिरीक्षक अंबादास हुलगे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार अंकुश कुलांगे, देवेंद्र सगळगिळे, संदीप बडे, सुभाष पठारे आणि रोहित कांबळे यांनी सहभाग घेतला. यावेळी बॉम्बशोधक पथकातील श्वान ‘लुसी’ हिचीही मदत घेऊन
कोठला फलटन चौक बारा इमाम हवेली – मंगलगेट आडते बाजार – पिंजारगल्ली – पारशाखुंट जुना कापड बाजार – देवेंद्र हॉटेल ख्रिस्त गल्ली – बुरुड गल्ली -जुना बाजार – पंचपिर चावडी – मनपा – दो बोटी चिरा मस्जिद – कोर्टाच्या मागील बाजुने – चौपाटी कारंजा -दिल्ली गेट – निलक्रांती चौक बालीकाश्रम रोड – सावेडी या मिरवणूक मार्गावरील विविध ठिकाणांची तपासणी करण्यात आली.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

शहरात ठिकठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त (Muharram Visarjan Miravnuk)

मोहरम विसर्जन मिरवणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी शहरात ठिकठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. संवेदनशील ठिकाणांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत असून, नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करून शांतता आणि सलोखा कायम ठेवावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.