Nagar : नगर : बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर शहरात शांतता, कायदा-सुव्यवस्था आणि सामाजिक सलोखा कायम राखण्यासाठी प्रशासनाने विशेष उपाययोजना कराव्यात, भारताच्या कृषीप्रधान संस्कृतीत गाईला असलेले महत्त्व लक्षात घेऊन तिला ‘राष्ट्रीय पशू’ घोषित करण्याची केंद्र सरकारकडे शिफारस पाठवावी, अशी मागणी मुस्लिम समाजाचे प्रतिनिधी, शांतता समितीचे सदस्य यांच्या वतीने करण्यात आली.
हेही पहा : नाशिकमध्ये आणखी एका भोंदूबाबाचा पर्दाफाश! सोलापूरच्या दोघांना लाखोंचा गंडा…
प्रशासनाला निवेदन
मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया आणि जिल्हा पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका यांना निवेदन दिले. यावेळी साहेबान जहागीरदार, माजी नगरसेवक समद खान, मौलाना शफीक कासमी, सामाजिक कार्यकर्ते खालिद शेख, अकबर अली शेख, नईम सरदार, संजू जहागीरदार, मोहसिन शेख यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
नक्की वाचा : सुजय विखे यांच्यासह सत्यजित कदम, भानुदास बेरड, वसंत लोढा विधान परिषदेसाठी इच्छुक
गोवंश रक्षणाला चालना मिळावी (Nagar)
निवेदनात म्हटले की, सणाच्या काळात काही समाजकंटक सोशल मीडियावर खोट्या किंवा जुन्या पोस्ट व्हायरल करून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे व्हॉट्सॲप, इन्स्टाग्रामसह विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सायबर पोलिसांनी आधीपासूनच लक्ष ठेवून अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. भारताच्या कृषीप्रधान संस्कृतीत ‘गोमाता’ हे कोट्यवधी हिंदू बांधवांचे श्रद्धास्थान असून मुस्लिम समाज त्या भावनांचा पूर्ण आदर करतो, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. समाजात कायमस्वरूपी शांतता, बंधुभाव आणि परस्पर विश्वास वृद्धिंगत व्हावा, तसेच गोवंश रक्षणाला चालना मिळावी यासाठी गाईला ‘राष्ट्रीय पशू’चा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.



