
Nagar Taluka Police : नगर : नगर तालुका पोलिसांनी (Nagar Taluka Police) एका अनोळखी महिलेची ओळख पटविण्यासाठी नागरिकांकडे मदतीचे आवाहन केले आहे. संबंधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू (Death) झाला असून तिच्या नातेवाईकांचा शोध सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मानवसेवा प्रकल्प, अरणगाव (ता. जि. अहिल्यानगर) येथे राहणारी उज्वला डांबरे अंदाजे ५० वर्षीय महिला १५ एप्रिल रोजी आजारी (Illness) अवस्थेत आढळून आली होती.
नक्की वाचा : स्थानिक गुन्हे शाखेकडून जबरी चोरी करणारी टोळी जेरबंद; अकरा लाखांचा मुद्देमाल हस्तगत
मृत महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही
तिला उपचारासाठी अहिल्यानगर येथील जिल्हा रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असताना २१ एप्रिल रोजी सकाळी तिचा मृत्यू झाला. नगर तालुका पोलीस ठाण्यात याबाबत मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत महिलेची ओळख अद्याप पटलेली नसून तिच्या नातेवाईकांचा शोध घेतला जात आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
संपर्क साधण्याचे आवाहन (Nagar Taluka Police)
महिलेचे वर्णन असे : रंग गोरा, शरीर सडपातळ, केस काळे-पांढरे, चेहरा उभट, डोळे साधारण, नाक सरळ असून अंगात पिवळ्या व राखाडी पट्ट्यांचा गाऊन होता.या महिलेची ओळख कोणाला पटत असल्यास किंवा तिच्या नातेवाईकांबाबत माहिती असल्यास नगर तालुका पोलीस ठाणे अथवा पोलीस अमलदार मनीषा काळे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


