Nasrapur Case : नसरापूर अत्याचार प्रकरणात कोर्टात काय घडलं? आरोपीला फाशी की जन्मठेप?

0
Nasrapur Case : नसरापूर अत्याचार प्रकरणात कोर्टात काय घडलं? आरोपीला फाशी की जन्मठेप?
Nasrapur Case : नसरापूर अत्याचार प्रकरणात कोर्टात काय घडलं? आरोपीला फाशी की जन्मठेप?

Nasrapur Case : १ मे ला ज्यावेळी संपूर्ण राज्यात महाराष्ट्र दिन साजरा होत होता,त्याच दिवशी विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूरमध्ये (Nasrapur Case) एका साडेतीन वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिचा खून (Murder Case) करण्यात आला होता. त्यानंतर राज्यभरात मोर्चे झाले आणि या घटनेचे संतापजनक पडसादही उमटल्याचे आपल्याला पाहायला मिळाले.मात्र विशेष बाब म्हणजे हा गुन्हा घडल्यानंतर अवघ्या पावणेदोन महिन्यात या खटल्यावर आज सुनावणी झाली आहे.

राज्यातील न्यायालयीन इतिहासात जलदगतीने सुनावणी झालेला नसरापूर अत्याचार प्रकरण हा पहिला खटला ठरणार आहे. या प्रकरणात भीमराव प्रभाकर कांबळे (Bhimrao Kamble) याला अटक करण्यात आली. आता आज या प्रकरणी न्यायालयात नेमकं काय घडलं? हे सविस्तर जाणून घेऊ…

नक्की वाचा : केतन अग्रवालला मारण्याचा सियाचा प्लॅन A फसला, पण प्लॅन B सक्सेसफुल,सियाचा प्लॅन C काय होता?

न्यायालयात नेमकं काय घडलं? (Nasrapur Case)

नसरापूर हत्या प्रकरणातील भिमराव कांबळेला न्यायालयाने या प्रकरणी दोषी ठरवले आहे. या प्रकरणात ज्या ज्या कलमांखाली खटला चालला ते सगळे गुन्हे सिद्ध झाले. त्यापैकी दोन गुन्ह्यांमध्ये फाशीच्या शिक्षेची तरतुद आहे. एका गुन्ह्यात आजन्म जन्मठेपेची तर एका गुन्ह्यात १४ वर्षा़च्या कारावासाच्या शिक्षेची तरतूद असल्याची कोर्टाची माहिती आहे. या खटल्याची सुनावणी सुरु झाली तेव्हा न्यायाधीशांनी दोषी भिमराव कांबळेला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करुन विचारले की, तु तो प्रसंग आठव आणि तुच सांग की तुला कोणती शिक्षा द्यायला पाहिजे. त्यावर दोषी भिमराव कांबळेने पुन्हा बनाव रचला आणि न्यायालयाला सांगितले की, “मी त्या दिवशी त्या मुलीला गाठी शेव खाण्यासाठी घेऊन गेलो होतो. मात्र मीच पाय घसरून पडलो आणि त्याचवेळी त्या मुलीच्या डोक्यालाही मार लागला. मी तिला  शांत करण्याचा प्रयत्न केला पण ती सारखी ओरडत होती, असंही आरोपीने म्हटलं आहे.

त्यानंतर न्यायाधीशांनी दोषी ठरलेल्या भीमराव कांबळेला म्हटले की “आता तु जे सांगतो आहेस तो इतिहास झालाय, कारण तुझ्यावर गुन्हा सिद्ध झालाय. तुला कोणती शिक्षा द्यायला हवी”, न्यायाधीशांच्या या म्हणण्यावर भिमराव कांबळेने कोणतेच उत्तर दिले नाही. त्यानंतर न्यायाधीशांनी त्याला खाली बसायला सांगितले. गुन्हेगार ठरलेल्या भिमराव कांबळेला कोणती शिक्षा देण्यात यावी यासाठी दोन्ही पक्षांकडून न्यायाधीशांसमोर युक्तीवाद करण्यात आलाय. सरकारी वकिलांकडूनदोषी  भिमराव कांबळेला मृत्युदंड देण्याची मागणी न्यायाधीशांकडे करण्यात आली आहे.

अवश्य वाचा : कलेसाठी जगणं म्हणजे काय? ‘ईठा’च्या टीझरमधून उलगडली तमाशा सम्राज्ञी विठाबाईंची संघर्षगाथा

सरकारी वकिलांचा युक्तिवाद काय?  (Nasrapur Case)

सरकारी वकिलांनी न्यायालयासमोर युक्तिवाद करताना सांगितले की, भिमराव कांबळेला त्याने केलेल्या कृत्याबद्दल कोणताही पश्चाताप नाही. तो दयेच्या लायकीचा नाही. ज्या मुलीने त्याच्यावर विश्वास ठेवला त्या मुलीवर त्याने ३९ मिनिटे अतिशय घृणास्पद प्रकार केला. वैद्यकिय तपासणीत भिमराव कांबळेने या मुलीवर विविध प्रकारे लैंगिक अत्याचार केल्याच समोर आलं असल्याचं सरकारी वकिलांनी यावेळी सांगितलं. त्या लहान मुलीच्या अंगावर अठरा जखमा या आरोपीने लैंगिक अत्याचार करताना केल्या.

समाजात मुली आणि महिलांना सुरक्षित वाटावे यासाठी प्रयत्न केले जातात. मात्र असे कृत्य समोर आलं की,भितीचे वातावरण निर्माण होते. त्यामुळे याला फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी सरकारी वकिलांनी केलीय. या भिमराव कांबळेने फक्त वासनेसाठी हे कृत्य केलेले आहे,असंही या वकिलांनी सांगितले. या सुनावणीदरम्यान पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक संदिपसिंह गिल हे देखील न्यायालयात आले होते. या दोषीला योग्य शिक्षा न झाल्यास सामान्यांचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास हलण्याची भिती देखील सरकारी वकिलांनी व्यक्त केली आहे.

नसरापूर मधील हे अत्याचार प्रकरण अत्यंत संवेदनशील असल्याने या प्रकरणाची सुनावणी बंद दाराआड झाली. विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी पीडित बालिकेचे आई-वडील, आजी, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, पंच, तपास अधिकारी, न्यायवैद्यकीय तज्ज्ञ, डीएनए विश्लेषक यांच्यासह ५५ जणांची साक्ष नोंदवली. या खटल्यात सरकार पक्ष आणि बचाव पक्षाने अंतिम युक्तिवाद आज पूर्ण केलाय. मंडळी भारतात ‘घटना ते शिक्षा’ या निकषावर सर्वांत जलद खटल्याची अधिकृत राष्ट्रीय नोंद किंवा मान्यता उपलब्ध नाही. त्यामुळे नसरापूर प्रकरणाला देशातील सर्वांत जलद खटला म्हणण्यापेक्षा, अत्यंत वेगाने सुनावणी पूर्ण झालेल्या उल्लेखनीय प्रकरणांपैकी एक असे म्हणावे लागेल.