नगर : पुण्याच्या भोर तालुक्यातील नसरापूर (Nasrapur Crime) येथे एका साडेतीन वर्षांच्या मुलीवर एका नराधमाने अत्याचार (Atrocity) करुन तिला ठार मारल्याची घटना १ मे ला घडली होती. या घटनेनंतर राज्यभरात संतप्त पडसाद उमटले होते. या लहान मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला तात्काळ फाशी द्यावी, या मागणीसाठी पुण्यातील नवले पूलावर नसरापूरच्या ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले होते. यानंतर राज्य सरकारने या प्रकरणाचा तपास आणि खटला फास्ट ट्रॅकवर चालवणार असल्याची ग्वाही दिलीय.अशातच आता पीडित मुलीचा शवविच्छेदन अहवाल म्हणजेच (Post Mortem report) समोर आला आहे. या अहवालातील माहिती अंगावर अक्षरश: काटा आणणारी आहे. आता या शवविच्छेदन अहवालात नेमकं काय आहे? ते जाणून घेऊ…
नक्की वाचा: केडगावात साखरपुड्याचा थाट ; १६ तोळे सोन्यावर चोरट्याचा डल्ला
नेमकं काय घडलं? (Nasrapur Crime)
ही साडेतीन वर्षांची मुलगी आपल्या पालकांसह पुण्यात राहत होती. मात्र आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्याने ती आपल्या आजोळी म्हणजेच नसरापूरला गेली होती. ती आवारात खेळत असताना आरोपीने तिला गोठ्यात वासरु दाखवायला नेतो सांगून आपल्यासोबत नेले होते आणि तिच्यावर अत्याचार केले होते. या प्रकरणातील आरोपी असलेल्या नराधमावर यापूर्वीही महिला लैंगिक अत्याचाराचे दोन गुन्हे दाखल आहेत.
अवश्य वाचा: राहुरीत अक्षय कर्डिलेंचा मोठा विजय; शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे गोविंद मोकाटे पराभूत
शवविच्छेदन अहवालात नेमकं काय? (Nasrapur Crime)
नसरापूरमधील पिडीतेच्या शवविच्छेदन अहवालात अनेक हादरवणाऱ्या गोष्टी नमूद करण्यात आल्या आहेत. या अहवालात नमूद केल्याप्रमाणे मुलीच्या तोंडात मोजा कोंबण्यात आला होता. लैंगिक अत्याचार करून तिचा खून करताना आरोपीने या मुलीच्या तोंडात पाय मोजा कोंबल्याचे तसेच छातीवर वळ उमटले असल्याचे शवविच्छेदन करताना निदर्शनात आले आहे. त्यामुळे या चिमुरडीची किती निर्घृणपणे हत्या करण्यात आली हे समजून येत आहे.
ससून रुग्णालय प्रशासनाने शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल पोलिसांना दिला आहे. हा अहवाल समोर आल्यानंतर आणखी संतप्त प्रतिक्रिया उमटल्यात. त्यामुळे या प्रकरणावरुन राज्य सरकार आणि पोलीस यंत्रणा पुन्हा एकदा टीकेच्या भोवऱ्यात सापडले आहेत. पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीची वैद्यकीय चाचणी देखील केली आहे. सध्या पोलिसांकडून सर्व पुराव्यांची जुळवाजुळव करण्याचे काम सुरु असून लवकरच आरोपपत्र दाखल होऊन या प्रकरणाचा खटला न्यायालयात सुरु होईल. मात्र या पीडितेचा शवविच्छेदन अहवालातून समोर आलेली माहिती मात्र मन हेलावून टाकणारी आहे.



