
National Dengue Day : अहिल्यानगर : वाढत्या उन्हाळा आणि आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डासांपासून (Mosquitoes) होणाऱ्या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी, एचबीटी श्रमिकनगर आपला दवाखाना येथे ‘राष्ट्रीय डेंग्यू दिवस २०२६’ (National Dengue Day) अत्यंत यशस्वीरित्या साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये आणि तरुण विद्यार्थ्यांमध्ये डेंग्यू या विषाणूजन्य आजाराविषयी व्यापक जनजागृती (Disease Awareness) करण्यात आली.

नक्की वाचा : आमदार संग्राम जगताप यांची सोशल मीडियावर बदनामी; कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
प्रमुख मान्यवरांची उपस्थिती
या विशेष कार्यक्रमाला अहिल्यानगर महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजुरकर, जिल्हा मलेरिया अधिकारी डॉ. वायभासे यांच्यासह स्थानिक नगरसेवक मनोज दुलम, करण कराळे आणि पुष्कर कुलकर्णी प्रामुख्याने उपस्थित होते. मान्यवरांनी आपल्या मनोगतातून डेंग्यूच्या वाढत्या धोक्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासकीय पातळीवर सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली व नागरिकांच्या सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
तज्ज्ञांचे मोलाचे मार्गदर्शन (National Dengue Day)
या प्रसंगी डॉ. सृष्टी बनसोडे मॅडम, श्री. अडेप सर आणि सिस्टर कविता खिलारी मॅडम यांनी उपस्थित नागरिकांना डेंग्यूची लक्षणे, डासांची उत्पत्ती रोखण्याचे उपाय आणि आजार झाल्यास घ्यावयाची काळजी याबद्दल अत्यंत मोलाचे व सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांच्या या योगदानाबद्दल आयोजकांतर्फे त्यांचे विशेष आभार मानण्यात आले.

NEET UG च्या विद्यार्थ्यांसाठी विशेष उपक्रम (National Dengue Day)
या मोहिमेचा एक भाग म्हणून, ‘अँबिशन बायोलॉजी अकॅडमी’ (Ambition Biology Academy) येथे काळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली NEET UG परीक्षेची तयारी करणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रातील भावी विद्यार्थ्यांसाठी विशेष आय.ई.सी. (माहिती, शिक्षण आणि संवाद – Information, Education and Communication) उपक्रम राबवण्यात आला.
या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना डेंग्यू विषाणूची रचना, त्याचा प्रसार करणारा ‘एडीज इजिप्ती’ डास आणि या आजाराचा जैविक व वैद्यकीय दृष्टिकोन समजावून सांगण्यात आला. भविष्यातील डॉक्टरांनी समाजाला जागरूक करावे या उद्देशाने हा उपक्रम अत्यंत प्रभावी ठरला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आरोग्य विभागाचे कर्मचारी, अकॅडमीचे शिक्षक आणि स्थानिक नागरिकांनी मोठे परिश्रम घेतले.


