
National Film Awards : नगर : भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रतिष्ठेचा समजला जाणारा 72वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (72nd National Film Awards) सोहळा गुजरातमधील केवडिया येथे पार पडला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते भारतीय चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय योगदान आणि उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कलाकार, दिग्दर्शक तसेच तंत्रज्ञांचा गौरव करण्यात आला. या सोहळ्यात अहिल्यानगरच्या मातीतील मराठी लघुपट ‘हमसफर’ला (Hamsafar wins Best Short Film) सर्वोत्कृष्ट लघुपटाचा ‘रजत कमल’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार निर्माते नरेंद्रकुमार फिरोदिया (Narendrakumar Firodia) व दिग्जदर्शक अभिजित दळवी यांनी स्वीकारला आहे.
नक्की वाचा : धीरज परदेशी हत्याकांड प्रकरणातील आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला; नऊ पैकी पाच आरोपींनी दाखल केला होता अर्ज
अनुष्का मोशन पिक्चर्स अँड एंटरटेन्मेंटची प्रस्तुती
अनुष्का मोशन पिक्चर्स अँड एंटरटेन्मेंटची प्रस्तुती असणारा हा लघुपट आहे. या लघुपटात मुख्य भूमिका ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर यांची आहे. या लघुपटाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यात एकही संवाद नाही. संपूर्ण कथा पात्रांच्या चेहऱ्यावरील भाव आणि पार्श्वसंगीताच्या माध्यमातून पुढे सरकते. ही कथा एका आजोबांची (विजय पाटकर) आणि त्यांच्या जुन्या रेडिओची आहे. हा रेडिओ केवळ एक वस्तू नसून, त्यांच्यासाठी एक हक्काचा ‘हमसफर’ (सोबती) बनला आहे. वस्तूंच्या माध्यमातून जुन्या आठवणी कशा जिवंत राहतात आणि माणसाचे वस्तूंशी किती घट्ट भावनिक नाते जडू शकते, याचे उत्कृष्ट चित्रण यात केले आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
यापूर्वीही विविध पुरस्कार (National Film Awards)
यापूर्वीही या लघुपटाला विविध पुरस्कार आणि सन्मान मिळाले आहेत. या लघुपटाला ‘दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल 2025’ मध्ये ‘सर्वोत्कृष्ट लघुपट’ (Best Short Film) या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. गोव्यात पार पडलेल्या 56 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFI 2025) ‘इंडियन पॅनोरमा’ अंतर्गत या फिल्मचे विशेष स्क्रीनिंग करण्यात आले आणि तिथे समीक्षकांनी याचे भरभरून कौतुक केले. आणि आता राष्ट्रीय पुरस्काराने आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.


