
Dhiraj Pardeshi Murder Case : नगर : अहिल्यानगर महापालिकेतील कंत्राटी (Ahilyanagar Municipal Corporation) कर्मचारी धीरज परदेशी हत्या प्रकरणात (Dhiraj Pardeshi Murder Case) जिल्हा व सत्र न्यायालयाने पाच आरोपीचा जामीन अर्ज फेटाळले (Bail Applications Rejected) आहे. या प्रकरणातील नऊ आरोपींपैकी पाच जणांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला होता.
नक्की वाचा : हक्काचे पाणी व विजेच्या संघर्षासाठी तयार रहा : बाळासाहेब थोरात
९ ऑगस्ट रोजी मृत्यू
घटनाक्रम असा की, धीरजसिंह परदेशी यांच्यावर ७ ऑगस्ट रोजी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास मुकुंदनगर परिसरातील दर्गा दायरा कब्रस्तान येथे जीवघेणा हल्ला झाला होता. फिर्यादी अक्षय मुळे तसेच मयत धीरज परदेशी व साक्षीदार काव्य गणेश तावरे, हे स्ट्रीट लाइटच पॅनलचे काम करीत असताना, तेथे आरोपी नामे मेहराज सैयद, सिराज सैयद, मुस्तकीन सैयद, युनुस शेख व इतर २-३ अनोळखी इमसमांनी गैरकार्याची मंडळी एकत्रित जमले. त्यांनी धीरजसिंह परदेशी यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान त्यांचा ९ ऑगस्ट रोजी मृत्यू झाला.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
आरोपी व सरकार पक्षातर्फे युक्तिवाद (Dhiraj Pardeshi Murder Case)
पोलिसांच्या तपासादरम्यान या घटनेमध्ये आणखी ९ आरोपींचे नाव निष्पन्न झाली. त्यामध्ये युनुस खानसाहेब शेख, वसीम रहीम सय्यद, इम्रान मुसा सय्यद, अरमान लियाकत सय्यद, मोहम्मदरशाद इम्रान सय्यद या आरोपींनी न्यायालयात जामीन मिळविण्यासाठी अर्ज दाखल केलेला होता. या प्रकरणात आरोपी व सरकार पक्षातर्फे युक्तिवाद करण्यात आला. ही घटना घडवून आणण्यासाठी आरोपींनी पूर्वनियोजित कट रचला होता आणि या प्रकरणात तपास प्राथमिक स्तरावर आहे. आरोपींची ओळख परेड घेणे बाकी आहे. अशा अनेक मुद्दयांवर युक्तिवाद झाला.
सरकार पक्षाचा भरभक्कम युक्तिवाद ऐकून न्यायालयाने आरोपींचे नियमित जामीन अर्ज रद्द केलेले आहे.याप्रकरणी सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी वकील पुष्पा कापसे-गायके यांनी काम पाहिले तसेच त्यांना मूळ फिर्यादीचे वकील अॅड. सुहास टोणे, अॅड. सागर टाक व अॅड. अमित गाडेकर यांनी सहकार्य केले.


