Nilesh Lanke : लोणी व्यंकनाथ येथील मृत्यू प्रकरण; खासदार लंके स्वतः च बनले तक्रारदार

'जिरवाजिरवीच्या' हेतूने गुन्हे दाखल केल्याचाआरोप

0
Nilesh Lanke : लोणी व्यंकनाथ येथील मृत्यू प्रकरण; खासदार लंके स्वतः च बनले तक्रारदार
Nilesh Lanke : लोणी व्यंकनाथ येथील मृत्यू प्रकरण; खासदार लंके स्वतः च बनले तक्रारदार

Nilesh Lanke : श्रीगोंदा : “इतरांची फिर्याद घेता, मग माझी का नाही? मी स्वतः या प्रकरणात फिर्यादी (prosecutor) बनत आहे, तक्रार नोंदवून घ्या!” असा आक्रमक पवित्रा खासदार   निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी घेत तक्रार अर्ज पोलिसांच्या हातात टेकवला. खासदारांच्या या अचानक आणि कडक भूमिकेमुळे चक्रावलेल्या पोलीस प्रशासनाची (Police Administration) चांगलीच धावपळ उडाली.

नक्की वाचा : समर्पण चातुर्मास निमित्त प्रविणऋषीजी म.सा. यांचा मंगल प्रवेश उत्साहात

वैद्यकीय मदत न मिळाल्याने निष्पाप बालकांचा मृत्यू

श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथील दोन भगिनींच्या दुर्दैवी मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या आरोग्य विभागाच्या बेजबाबदार अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा यासाठी खासदार लंके यांनी रविवारी (ता. २६) थेट श्रीगोंदा पोलीस ठाणे गाठून पोलीस प्रशासनाला हादरवून सोडले. आनंदी अनिल कांडेकर (वय ४) आणि वीरा प्रवीण कांडेकर (वय ३) या दोन चिमुकल्या शेततळ्यात पडल्याची घटना घडल्यानंतर, त्यांना तातडीने उपचारासाठी नेण्यासाठी आरोग्य विभागाची रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध झाली नाही. वेळेवर वैद्यकीय मदत न मिळाल्याने या दोन्ही निष्पाप बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. 

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

‘जिरवाजिरवीच्या’ हेतूने गुन्हे दाखल केल्याचाआरोप (Nilesh Lanke)

वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत मुळे, डॉ. शैला डांगे आणि डॉ. स्नेहल गायकवाड यांच्या अक्षम्य निष्काळजीपणामुळेच या चिमुकल्यांचा जीव गेल्याचा थेट आरोप ग्रामस्थांनी केला आहे.घडलेल्या घटनेमुळे लोणी व्यंकनाथ गावात संतापाची उसळला तर आरोग्य यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे दोन घरे उद्ध्वस्त झाली असे असताना, दुसरीकडे न्यायासाठी जाब विचारणाऱ्या टिळक भोस, स्मितल वाबळे यांच्यासह १५ आंदोलक ग्रामस्थांवर पोलिसांनी तडकाफडकी गुन्हे दाखल केले. पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी आंदोलकांच्या भावना समजून न घेता, रात्री उशिरापर्यंत थांबून केवळ ‘जिरवाजिरवीच्या’ आणि दूषित हेतूने गुन्हे दाखल केल्याचा घणाघाती आरोप खासदार निलेश लंके यांनी केला.

बेजबाबदार विधाने केल्याबद्दल लंकेंचा संताप

रविवारी (ता. २६) दुपारी खा. निलेश लंके यांनी लोणी व्यंकनाथ येथे जाऊन कांडेकर कुटुंबाचे सांत्वन केले. त्यानंतर त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी बाबासाहेब नागरगोजे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून नाराजी व्यक्त केली. अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती मांडगे यांनीही घटनास्थळी भेट देऊन बेजबाबदार विधाने केल्याबद्दल लंकेंनी संताप व्यक्त केला. कायद्यानुसार कोणतीही व्यक्ती फिर्यादी होऊ शकते, या मुद्द्यावर ठाम राहत खासदार लंकेंनी थेट श्रीगोंदा पोलीस ठाणे गाठले आणि दोषी डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी स्वतः फिर्यादी होत तक्रार अर्ज सुपूर्द केला. 

यावेळी ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस, बाळासाहेब नाहाटा, टिळक भोस, स्मितल वाबळे, प्रा. संजय लाकुडझोडे, सतीश बोरुडे, ॲड.समित बोरुडे, बाळासाहेब जठार, झहीर जकाते यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.