Onion Crop : कांदा पिकावरील बुरशीजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी राणी शेख यांचे महत्त्वपूर्ण संशोधन    

डॉ. शेख या 'सेट' आणि 'गेट' परीक्षाही उत्तीर्ण झाल्या

0
Onion Crop : कांदा पिकावरील बुरशीजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी राणी शेख यांचे महत्त्वपूर्ण संशोधन
Onion Crop : कांदा पिकावरील बुरशीजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी राणी शेख यांचे महत्त्वपूर्ण संशोधन

Onion Crop : पारनेर : कांदा (Onion Crop) हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे नगदी पीक आहे, मात्र, त्यावर पडणाऱ्या बुरशीजन्य रोगांमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान (Financial Loss) होते. या समस्येवर प्रभावी आणि पर्यावरणपूरक उपाय शोधण्यासाठी पारनेर येथील न्यू आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजच्या (New Arts, Commerce and Science College) वनस्पतीशास्त्र विभागातील संशोधक विद्यार्थिनी राणी शेख यांनी महत्त्वपूर्ण संशोधन केले आहे. त्यांच्या या संशोधनाबद्दल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने त्यांना पीएचडी (विद्यावाचस्पती) पदवी प्रदान केली आहे.

नक्की वाचा : ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रा देशभर जलसंवर्धनाचा नवा संदेश देईल : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नैसर्गिक घटकांवर भर

डॉ. राणी शेख यांनी आपल्या संशोधनासाठी ‘कांदा पिकावरील विविध बुरशीजन्य रोग व त्यांचे नियंत्रण’ हा विषय निवडला होता. रासायनिक कीटकनाशकांमुळे जमिनीचा पोत बिघडत असताना, त्यांनी आपल्या प्रयोगात नैसर्गिक घटकांवर भर दिला. विविध वनस्पतींच्या पानांचा अर्क, गायीचे गोमूत्र आणि ताक यांचा वापर करून प्रयोगशाळेत बुरशीजन्य रोगांवर यशस्वीरीत्या नियंत्रण मिळवता येते, हे त्यांनी आपल्या प्रबंधातून सिद्ध करून दाखवले आहे. त्यांचे हे संशोधन भविष्यात विषमुक्त आणि शाश्वत शेतीसाठी मैलाचे ठरणार आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

डॉ. शेख या ‘सेट’ आणि ‘गेट’ परीक्षाही उत्तीर्ण झाल्या (Onion Crop)

हे संशोधन पूर्ण करताना त्यांना महात्मा फुले कृषी विद्यापीठ (राहुरी) आणि कांदा व लसूण संशोधन केंद्र (राजगुरुनगर) यांचे तांत्रिक सहकार्य लाभले. डॉ. शेख यांचे हे संशोधन केवळ प्रबंधापुरते मर्यादित न राहता, त्याचे संशोधन नामांकित राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियतकांमधून प्रकाशित झाले आहे. शैक्षणिक क्षेत्रात आपली मोहोर उमटवणाऱ्या डॉ. राणी शेख यांनी यापूर्वी वनस्पतीशास्त्र विषयातून ‘सेट’ (SET) आणि ‘गेट’ (GATE) या अत्यंत कठीण परीक्षाही उत्तीर्ण झाल्या आहेत.

आहेर यांचे मोलाचे मार्गदर्शन

 या संशोधनासाठी त्यांना न्यू आर्टस् कॉमर्स अॕण्ड सायन्स महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या यशाबद्दल अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र दरे, उपाध्यक्ष डॉ. विवेक भापकर, सचिव अ‍ॅड. विश्वासराव आठरे पाटील, सहसचिव मुकेश मुळे, खजिनदार अ‍ॅड. दीपलक्ष्मी म्हसे यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे.

शेतकरी वर्गातूनही समाधान व्यक्त

तसेच संस्थेचे ज्येष्ठ विश्वस्त माजी आमदार नंदकुमार झावरे, सीताराम खिलारी, गव्हर्निंग कौन्सिल सदस्य डॉ. भाऊसाहेब खिलारी, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. तुकाराम थोपटे, आयक्यूएसी (IQAC) समन्वयक डॉ. दत्तात्रय घुंगार्डे, महाविद्यालयातील ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. दिलीप ठुबे, वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. रवींद्र देशमुख यांच्यासह सर्व प्राध्यापक आणि प्रशासकीय सेवकांनी डॉ. राणी शेख यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. त्यांच्या या संशोधनामुळे शेतकरी वर्गातूनही समाधान व्यक्त केले जात आहे.