Pachpute : नगर : विधानसभा अधिवेशनात आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी घोडेगाव येथील तरुण अभिषेक दरेकर यांच्या वीज पडून झालेल्या दुर्दैवी मृत्यूचा मुद्दा उपस्थित करून त्यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून तातडीने व भरीव आर्थिक मदत देण्याची आग्रही मागणी केली आहे.
हेही वाचा : पाथर्डीतील जुन्या बसस्थानकात दोन वळूंची झुंज; प्रवाशांची उडाली तारांबळ
तातडीने आर्थिक आधार द्या…
नैसर्गिक आपत्तीच्या या संकटाच्या काळात पीडित दरेकर कुटुंबाला शासनाने तातडीने आर्थिक आधार द्यावा, अशी तीव्र भावना आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी सभागृहात व्यक्त केली. ही दुर्देवी घटना श्रीगोंदा तालुक्यातील घोडेगाव येथे घडली असून, अचानक वीज कोसळल्याने या तरुणाला आपला जीव गमवावा लागला.
नक्की पहा : प्राजक्त तनपुरे यांनी घेतली आमदारकीची शपथ
विधानसभा अधिवेशनात मागणी (Pachpute)
अशा गंभीर दुर्घटनांमधील मृत व्यक्तींच्या वारसांना महसूल व आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या निकषांनुसार महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग नियमावली अंतर्गत मदत देण्याची तरतूद असते. आमदार विक्रम पाचपुतेंनी याबाबत आर्थिक मदत देण्याची आग्रही मागणी विधानसभा अधिवेशनात केल्यामुळे दरेकर कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत मिळण्याची शक्यता नियम झाली आहे. यामुळे दरेकर कुटुंबाला मोठा आधार मिळण्यास मदत होणार आहे.



