
Parner Police Station : नगर : पारनेर पोलीस स्टेशनमध्ये (Parner Police Station) दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपींना तात्काळ अटक करून प्रभावी तपास करण्यात यावा, अशी मागणी फिर्यादी डॉ. मंगेश दत्तात्रय बेकारसे (Dr. Mangesh Dattatray Bekarse) यांनी कुंटुबासमवेत जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
नक्की वाचा : बिनविरोधवरून राजकीय नाट्य; दत्ता पानसरे यांचा आत्महत्येचा इशारा तर भाजपचे कार्यकर्तेही आक्रमक
निवेदनात नमूद केले आहे की
डॉ. बेकारसे यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, ३० मे रोजी भारतीय न्याय संहितेच्या विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आरोपींनी तब्बल १० लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा, जमाव जमवून हल्ला केल्याचा, रोख रक्कम हिसकावून घेतल्याचा तसेच सार्वजनिकरित्या अपमान व जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होऊन काही दिवस उलटूनही मुख्य आरोपी सुमेध गायकवाड, विजय मकासरे व इतर संबंधित आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आरोपी विविध सार्वजनिक कार्यक्रम, सामाजिक मेळावे व सत्कार समारंभांमध्ये उघडपणे वावरत असल्याचे फोटो व व्हिडिओ उपलब्ध असतानाही त्यांना अटक करण्यात आलेली नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
व्हिडिओ व रील्स प्रसारित करून दबाव टाकण्याचा प्रयत्न (Parner Police Station)
तसेच आरोपी व त्यांच्या समर्थकांकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून बदनामीकारक पोस्ट, व्हिडिओ व रील्स प्रसारित करून दबाव टाकण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. यामुळे आपल्या सामाजिक व व्यावसायिक प्रतिमेला धक्का पोहोचत असल्याचे डॉ. बेकारसे यांनी म्हटले आहे. या प्रकरणात जिल्हा पोलीस अधीक्षकांनी वैयक्तिक लक्ष घालून तपासाचा आढावा घ्यावा, सर्व आरोपींना त्वरित अटक करण्याचे निर्देश द्यावेत, आरोपी फरार असल्याच्या कारणांची चौकशी करावी, त्यांच्या सोशल मीडियावरील हालचालींची तपासणी करावी तसेच फिर्यादी व साक्षीदारांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. तपासात कोणताही हलगर्जीपणा आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.


