नगर : पोलीस दलात भरती होऊन खाकी वर्दीचे स्वप्न पाहणाऱ्या पारनेर (Parner Sucide News) तालुक्यातील एका २४ वर्षीय तरुणीने प्रशिक्षकाच्या अपमानास्पद वागणुकीला आणि सततच्या मानसिक छळाला कंटाळून गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची (Ended their life by hanging) धक्कादायक घटना आळेफाटा (Alephata) येथे घडली आहे. नेमका हा संपूर्ण प्रकार काय आहे ते पाहू…
नक्की वाचा : शाळेचा माजी विद्यार्थीच ठरला विद्यार्थिनींसाठी ‘पॅडमॅन’; शाळेला दिली सॅनिटरी पॅड वेडिंग मशीन भेट
नेमकं काय घडलं? (Parner Sucide News)
प्रशिक्षकाच्या अपमानास्पद वागणुकीला कंटाळून आपली जीवनयात्रा संपवणाऱ्या मुलीचे नाव भाग्यश्री भास्कर भंडारी असं आहे. ती मूळची अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील आळकुटी येथील होती. याप्रकरणी आळेफाटा पोलिसांनी त्वरित कारवाई करत सह्याद्री अकॅडेमीचा प्रशिक्षक मयूर अशोक डुंबरे (रा. खामुंडी, ता. जुन्नर) याच्याविरुद्ध आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून ताब्यात घेतले आहे.
अवश्य वाचा : प्रा.भाग्यशाली कार्ले यांच्या हर्बल औषध संशोधनाला भारत सरकारचे पेटंट
प्रशिक्षक आणि भाग्यश्रीमध्ये वाद? (Parner Sucide News)
भाग्यश्री भंडारी ही गेल्या एका वर्षापासून आळेफाटा येथील सह्याद्री अकॅडेमीमध्ये पोलीस भरतीची पूर्वतयारी करत होती. मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी एका वादाच्या प्रकरणात भाग्यश्रीमुळे प्रशिक्षक मयूर डुंबरे याला पोलीस ठाण्यात जावं लागले होते. याच गोष्टीचा राग मनात धरून डुंबरे तिच्यावर खार खाऊन होता. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी मैदानी सरावाला भाग्यश्री इतर काही मुलांसोबत गैरहजर राहिली होती. याच कारणावरून सोमवारी वर्गात सगळ्या विद्यार्थ्यांसमक्ष प्रशिक्षक डुंबरे याने भाग्यश्रीला उभे करून तिच्या वैयक्तिक बाबींवरून अत्यंत अपमानास्पद आणि बोचऱ्या शब्दांत सुनावले.
वर्गात सर्वांसमोर झालेला हा अपमान आणि सतत होणारा मानसिक छळ सहन न झाल्याने भाग्यश्री प्रचंड नैराश्यात गेली. अखेर सोमवारी (दि.१०)ऑगस्टला दुपारच्या सुमारास तिने आळेफाटा येथील आपल्या भाड्याच्या खोलीत ओढणीच्या साहाय्याने गळफास लावून आपल जीवनच संपवले. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मृत भाग्यश्रीची बहीण शीतल भास्कर भंडारी (रा. घाटकोपर, मुंबई) हिने आळेफाटा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून प्रशिक्षक मयूर डुंबरे याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन पाटील या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.



