Padmashri Popatrao Pawar : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या राज्यस्तरीय मूल्यमापन समितीवर पद्मश्री पोपटराव पवार यांची निवड

Padmashri Popatrao Pawar : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या राज्यस्तरीय मूल्यमापन समितीवर पद्मश्री पोपटराव पवार यांची निवड

0

Padmashri Popatrao Pawar : हिवरे बाजार : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या (Chief Minister’s Samruddha Panchayat Raj Abhiyan) राज्यस्तरीय मूल्यमापन समितीवर पद्मश्री पोपटराव पवार (Padmashri Popatrao Pawar) यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. ग्रामविकास व पंचायतराज विभागाच्या अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली गठित करण्यात आलेल्या या समितीवर निवडीचे अधिकृत पत्र नुकतेच त्यांना प्राप्त झाले.

3 ग्रामपंचायतींची अत्युउत्कृष्ट ग्रामपंचायत म्हणून निवड

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत तालुकास्तरीय आणि जिल्हास्तरीय मूल्यमापनाची प्रक्रिया पूर्ण झाली असून, सध्या विभागस्तरीय मूल्यमापन सुरू आहे. विभागस्तरावर निवड झालेल्या उत्कृष्ट दोन ग्रामपंचायतींचे राज्यस्तरीय समितीमार्फत प्रत्यक्ष मूल्यमापन करण्यात येणार आहे. या मूल्यमापनातून सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या तीन ग्रामपंचायतींची राज्यस्तरीय अत्युउत्कृष्ट ग्रामपंचायती म्हणून निवड केली जाणार आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा.
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

राज्यस्तरीय मूल्यमापन समितीत संचालक, राज्य ग्रामीण विकास संस्था (यशदा), पुणे; मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद); संचालक, पंचायतराज; संचालक, राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण; बेला ग्रामपंचायत, ता. व जि. भंडारा येथील सरपंच शारदा गायधने; मंत्रालय पत्रकार संघाच्या वतीने नामनिर्देशित एक पत्रकार तसेच ग्रामविकास विभागाचे उपसचिव यांचा समावेश आहे.

पद्मश्री पोपटराव पवार यांची निवड ही पंचक्रोशीसाठी अभिमानाची बाब (Padmashri Popatrao Pawar)

ग्रामविकास, लोकसहभाग आणि आदर्श ग्रामनिर्मितीच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे पद्मश्री पोपटराव पवार यांची या समितीवर झालेली निवड ही हिवरे बाजारसह पंचक्रोशीसाठी अभिमानाची बाब मानली जात आहे. त्यांच्या निवडीचे हिवरे बाजार व पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करण्यात येत असून, या जबाबदारीतून राज्यातील ग्रामपंचायतींच्या उत्कृष्ट कार्याला अधिक प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.