Local Crime Branch : राहाता तालुक्यात वाळू तस्करांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; दोन डंपरसह ३० लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

Local Crime Branch : राहाता तालुक्यात वाळू तस्करांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; दोन डंपरसह ३० लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

0
Local Crime Branch : राहाता तालुक्यात वाळू तस्करांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; दोन डंपरसह ३० लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत
Local Crime Branch : राहाता तालुक्यात वाळू तस्करांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; दोन डंपरसह ३० लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

Local Crime Branch : नगर : राहाता तालुक्यातील नपावाडी परिसरात अवैध वाळू वाहतुकीवर (Illegal sand transportation) स्थानिक गुन्हे शाखेने (Local Crime Branch) कारवाई करत दोन डंपर आणि वाळूसह तब्बल 30 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत दोन चालकांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्या विरोधात राहाता पोलीस ठाण्यात (Rahata Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांचे पथक अवैध वाळू वाहतुकीवर लक्ष ठेवून

विशाल नितीन कोल्हे (वय २१, रा. गणेशवाडी, शिर्डी) आणि दौलत एकनाथ सोनवणे (वय ४०, रा. केलवड, ता. राहाता) असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा व वाहतुकीविरोधात कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक अवैध वाळू वाहतुकीवर लक्ष ठेवून होते.

बुधवारी (ता.१२ ) पथकाला गुप्त बातमीदारामार्फत नपावाडी, ता. राहाता परिसरातून पुणतांबा-शिर्डी मार्गावर अवैधरीत्या वाळू वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी नपावाडी चौफुला येथे सापळा रचला.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा.
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

३० लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त (Local Crime Branch)

यावेळी दोन पिवळ्या रंगाचे डंपर येताना दिसल्यानंतर पोलिसांनी ते थांबवून तपासणी केली. दोन्ही डंपरमध्ये वाळू आढळून आली. चालकांकडे वाळू वाहतुकीचा परवाना आहे का, याबाबत चौकशी केली असता त्यांच्याकडे कोणताही परवाना नसल्याचे समोर आले.
या कारवाईत विशाल नितीन कोल्हे (वय २१, रा. गणेशवाडी, शिर्डी) आणि दौलत एकनाथ सोनवणे (वय ४०, रा. केलवड, ता. राहाता) यांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून १५ लाख रुपये किमतीचा डंपर, २० हजार रुपयांची वाळू, तसेच १५ लाख रुपये किमतीचा विनाक्रमांकाचा डंपर आणि २० हजार रुपयांची वाळू असा एकूण ३० लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

चौकशीत दोन्ही चालकांनी आपण शिर्डी येथील ‘कोते’ आणि नांदुर्खी येथील ‘चौधरी’ यांच्या सांगण्यावरून वाळू वाहतूक करत असल्याचे पोलिसांना सांगितले. या प्रकरणी राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास राहाता पोलीस करत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार अतुल लोटके, निळकंठ कारखेले, रणजीत जाधव, योगेश कर्डीले आणि दीपक जाधव यांच्या पथकाने केली.