नगर : कष्टाची भाकर कमवून घराकडे परतणाऱ्या कुटुंबावर काळाने असा काही घाला घातलाय,ज्यामुळे संपूर्ण मिरी गाव (Miri Village) शोकाकुळ झाले आहे. हमालीचे काम संपवून घराची वाट धरलेल्या पाथर्डी तालुक्यातील (Pathardi Accident) मिरी येथील हमालीचे काम करणाऱ्या दोन चुलत भावांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू (Two brothers die in accident) झाला. एकाच वेळी दोन तरुण मुलांचा असा अचानक अंत झाल्याने एका कुटुंबाचा आधार हिरावला गेलाय. रविवारी (ता.२)ऑगस्टला मध्यरात्री नेवासा तालुक्यातील वडाळा परिसरात अहिल्यानगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर ही घडली.
नक्की वाचा : अजितदादांना मरणोत्तर पद्मविभूषण देण्याची मागणी; विक्रम काकडे यांनी घेतली अमित शाहांची भेट
नेमकं काय घडलं? (Pathardi Accident)

मिळालेल्या माहितीनुसार, मिरी येथील सचिन उर्फ रोडया मिरपगार व रवी मिरपगार हे दोघे आपल्या इतर मित्रांसह कांद्याच्या गोण्या मालवाहतूक ट्रकमध्ये भरण्याचे हमालीचे काम करण्यासाठी नेवासा तालुक्यातील विविध ठिकाणी जात होते. रविवारी मध्यरात्री एका मालवाहतूक ट्रकमध्ये कांद्याच्या गोण्या भरून दिल्यानंतर सगळेच रात्री १ च्या दरम्यान आपल्या गावाकडे पार्ट निघाले होते. याच दरम्यान, वडाळा परिसरात त्यांच्या दुचाकीला एका चारचाकी वाहनाची जोरदार धडक बसली. या भीषण अपघातात सचिन उर्फ रोडया मिरपगार यांचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झालेल्या रवी मिरपगार यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अवश्य वाचा : WhatsApp अकाऊंट होणार बंद, ‘या’ चुका तुम्हाला महागात पडणार!
मिरी गावावर शोककळा (Pathardi Accident)
मात्र, उपचार सुरू असताना त्यांचीही प्राणज्योत मालवली. यावेळी त्यांच्यासोबत असलेले इतर मित्र मिरी येथील महालक्ष्मी देवीची कावड घेऊन गेलेल्या भाविकांकडे वडाळा येथे मुक्कामासाठी थांबल्याने ते या दुर्घटनेतून बचावले. मात्र, या दोन भावांना मात्र जीवाला मुकावे लागले आहे. सचिन मिरपगार व रवी मिरपगार हे चुलत भाऊ तर होतेच मात्र त्यासोबतच ते एकमेकांचे जिवलग मित्र ही होते. एकाच अपघातात दोघांचाही मृत्यू झाल्याने मिरी गावासह संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.



