Planting of 300 trees at Manjarsumba : जीकेएन कंपनीकडून मांजरसुंबा येथे ३०० वृक्षांचे वृक्षारोपण; पर्यावरण संवर्धनाचा संदेश

Planting of 300 trees at Manjarsumba : जीकेएन कंपनीकडून मांजरसुंबा येथे ३०० वृक्षांचे वृक्षारोपण; पर्यावरण संवर्धनाचा संदेश

0

Planting of 300 trees at Manjarsumba : नगर : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी (Maintaining Environmental Balance) वृक्षारोपणाबरोबरच त्यांचे संवर्धन करणे ही आजची सर्वात मोठी गरज असल्याचे प्रतिपादन जीकेएन कंपनीचे आशिया उपाध्यक्ष ली सन यांनी केले. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त (World Environment Day) जीकेएन कंपनीच्या वतीने अहिल्यानगर तालुक्यातील आदर्श गाव मांजरसुंबा येथे विविध प्रजातींच्या सुमारे ३०० वृक्षांची लागवड (Planting of 300 trees at Manjarsumba) करण्यात आली.

ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित

या कार्यक्रमास जीकेएन कंपनीचे राजेश मीराणी, सचिन आसोले, सिद्धार्थ मित्रा, सुधीर पोळ, पुरुषोत्तम ऋषी, अभिजित कुलकर्णी,सुनील राठी, बबन हिंगे, सिद्धार्थ भोसले, ऋषिकेश सुकाळे, अविनाश कुलकर्णी, विठ्ठल हांडोरे, रमेश म्हस्के, मनोज गोरे, मिलिंद जपे, तसेच सरपंच रूपाली कदम, उपसरपंच जालिंदर कदम, विलास भुतकर, बाळासाहेब कदम, अक्षय कदम, सारिका वाळुंज, छाया कदम, आशाबाई कदम, चंद्रभान कदम, इंद्रभान कदम यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा.
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

यावेळी बोलताना ली सन म्हणाले, (Planting of 300 trees at Manjarsumba)

वाढते प्रदूषण, बदलते हवामान आणि नैसर्गिक साधनसंपत्तीवर वाढत असलेला ताण यामुळे पर्यावरण संवर्धनाला प्राधान्य देणे आवश्यक आहे. पाणी, माती आणि जैवविविधतेचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने वृक्षारोपणात सहभाग घ्यावा. वृक्ष लावणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच त्यांचे संगोपन करणेही गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

Planting of 300 trees at Manjarsumba : जीकेएन कंपनीकडून मांजरसुंबा येथे ३०० वृक्षांचे वृक्षारोपण; पर्यावरण संवर्धनाचा संदेश
Planting of 300 trees at Manjarsumba : जीकेएन कंपनीकडून मांजरसुंबा येथे ३०० वृक्षांचे वृक्षारोपण; पर्यावरण संवर्धनाचा संदेश

ते पुढे म्हणाले, निरोगी अन्न, स्वच्छ हवा आणि शाश्वत पर्यावरण हीच भावी पिढीसाठी सर्वात मोठी संपत्ती आहे. जीकेएन कंपनीने केवळ वृक्षारोपण न करता या वृक्षांचे नियमित संवर्धन करण्याची जबाबदारीही स्वीकारली आहे.

भारत आणि चीन यांच्यात भौगोलिकदृष्ट्या हिमालय असला तरी दोन्ही देशांतील नागरिकांनी सांस्कृतिक देवाणघेवाण आणि परस्पर संवाद वाढविणे आवश्यक असल्याचेही ली सन यांनी नमूद केले. “मी अनेक देशांचा प्रवास केला आहे; मात्र भारतातील संस्कृती, ग्रामजीवन आणि सामाजिक एकोप्याचा अनुभव वेगळाच आहे. विशेषतः महिलांचे नेतृत्व, ग्रामविकासातील त्यांचा सहभाग आणि बचत गटांच्या माध्यमातून होत असलेली सेंद्रिय शेती ही प्रेरणादायी बाब आहे,” असे ते म्हणाले.

कार्यक्रमाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ग्रामस्थांनी वृक्ष लागवड आणि संवर्धनाचा संकल्प केला.