Pathardi Police : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी आक्षेपार्ह पोस्ट; पाथर्डी पोलिसांकडून तरुणाला अटक

शांतता भंग करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप

0
Pathardi Police : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी आक्षेपार्ह पोस्ट; पाथर्डी पोलिसांकडून तरुणाला अटक
Pathardi Police : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी आक्षेपार्ह पोस्ट; पाथर्डी पोलिसांकडून तरुणाला अटक

Pathardi Police : पाथर्डी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी सोशल मीडियावर (Social media) आक्षेपार्ह व अवमानकारक मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी पाथर्डी पोलिसांनी (Pathardi Police) गुन्हा दाखल करून आरोपीला (Accused) अवघ्या काही तासांत अटक केली. या घटनेनंतर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आरोपीवर तातडीने कारवाई करण्याची मागणी करत पोलिसांना निवेदन दिले होते.

नक्की वाचा : जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राम शिंदेंच्या भेटीगाठी; राजकीय चर्चांना उधाण

शांतता भंग करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप

याबाबत आकाश इंद्रजीत शिंदे (रा. निवडुंगे, ता. पाथर्डी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २९ जुलै रोजी दुपारी त्यांच्या मोबाईलवर व्हॉट्सअॅपद्वारे एका इंस्टाग्राम पोस्टचा स्क्रीनशॉट प्राप्त झाला. संबंधित पोस्टमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत आक्षेपार्ह व अवमानकारक मजकूर असल्याचे निदर्शनास आले. चौकशीअंती संबंधित इंस्टाग्राम खाते नवनाथ भीमाजी ससे (रा. निवडुंगे) यांचे असल्याची खात्री झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. संबंधित पोस्टमुळे आंबेडकरी अनुयायींचा अपमान झाला असून समाजात द्वेष निर्माण करून सार्वजनिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी पाथर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे वेगाने फिरवत आरोपीला काही तासांत अटक केली.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी (Pathardi Police)

कारवाईदरम्यान पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहन खंडागळे, पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर इलग, सागर बुधवंत, इजाज सय्यद आणि संजय जाधव यांनी आरोपीला अटक केली.यापूर्वी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आरोपीला तत्काळ अटक करण्याची मागणी करत पोलिसांना निवेदन दिले होते. तालुकाध्यक्ष पप्पू बोर्डे यांच्यासह आकाश शिंदे, नवनाथ गोंधणे, इंद्रजीत शिंदे, मनोहन चव्हाण, लहू शिंदे, अनिल शिंदे, राहुल शिंदे, सुधाकर शिंदे, सुभाष शिंदे, मीना शिंदे, कामिनी शिंदे, कमल शिंदे, ललिता शिंदे, सुरेखा ठोकळ, सुशिला शिंदे आदींच्या स्वाक्षऱ्या असलेले निवेदन सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहन खंडागळे यांनी स्वीकारले होते.नवनाथ ससे याला गुरुवारी (ता. ३०) जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.