PM Kisan Yojana 23rd Installment: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज! ‘या’ तारखेला जमा होणार पीएम किसान योजनेचा २३ वा हप्ता

0
PM Kisan Yojana 23rd Installment: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज! 'या' तारखेला जमा होणार पीएम किसान योजनेचा २३ वा हप्ता
PM Kisan Yojana 23rd Installment: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज! 'या' तारखेला जमा होणार पीएम किसान योजनेचा २३ वा हप्ता

नगर : भारतातील कोट्यवधी शेतकरी, हे पीएम किसान योजनेशी (PM Kisan Yojana 23rd Installment) जोडले गेलेले आहेत. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीत वर्षाला सहा हजार रुपये जमा होतात. पात्र शेतकर्‍यांना तीन टप्प्यात दोन हजार रुपये दिले जातात. गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा २३ वा हप्ता (23rd Installment) कधी मिळेल,याची उत्सुकता लागली होती. याविषयीची मोठी माहिती आता समोर आली आहे. मान्सूनच्या प्रतिक्षेत असलेल्या शेतकर्‍यांना येत्या तीन दिवसात पीएम किसानचा हप्ता मिळेल.

नक्की वाचा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट प्रश्न विचारणारी ‘ती’ नगरची चिमुरडी ‘अहिल्या’!

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते हफ्त्याचे वितरण  (PM Kisan Yojana 23rd Installment)

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचे आतापर्यंत एकूण २२ हप्ते जमा करण्यात आले आहेत. मागील हफ्ता १३ मार्च २०२६ रोजी २२ वा हप्ता गुवाहाटी येथून वितरीत करण्यात आला होता. दरवेळी पीएम किसान योजनेचा हप्ता स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी वितरीत करतात. यावेळी सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २३ वा हप्ता लोकांना संबोधित केल्यानंतर डीबीटी प्रणालीमार्फत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात हप्ता जमा करतील.

अवश्य वाचा : अकोलेतील शेतकऱ्याची दीड एकरातील जांभूळ बागेतून लाखोंची कमाई

२३ वा हफ्ता कधी मिळणार? (PM Kisan Yojana 23rd Installment)

पीएम किसान योजनेचा २३ वा हप्ता अजून ३ दिवसांनी म्हणजेच २० जून रोजी देण्यात येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पश्चिम बंगालमधील हुगळी येथील तारकेश्वर येथून २३ वा हप्ता वितरीत करतील. या विषयीची अधिकृत माहिती पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरून देण्यात आली आहे. २० जून २०२६ रोजी दुपारी ३ वाजून ४५ मिनिटांनी पीएम किसान योजनेचा २३ वा हप्ता जमा करण्यात येईल. ९.४४ कोटींहून अधिक पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात १८ हजार ८८० कोटींहून अधिक रक्कम हस्तांतरीत होईल.