Police Action : गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी एसपी मुम्मका सुदर्शन ॲक्शन मोडमध्ये; २२० सराईत गुन्हेगारांना समज

0
Police Action : गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी एसपी मुम्मका सुदर्शन ॲक्शन मोडमध्ये; २२० सराईत गुन्हेगारांना समज
Police Action : गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी एसपी मुम्मका सुदर्शन ॲक्शन मोडमध्ये; २२० सराईत गुन्हेगारांना समज

Police Action : नगर: जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी आणि गुन्हेगारी कारवायांना वेसण घालण्यासाठी पोलीस अधीक्षक (SP) मुम्मका सुदर्शन यांनी धडक मोहीम हाती घेतली आहे. या विशेष मोहिमेअंतर्गत, आज (४ जुलै) जिल्ह्यातील दक्षिण विभागातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील तब्बल २२० रेकॉर्डवरील सराईत आरोपींना पोलीस मुख्यालयात बोलावून त्यांचे कडक शब्दांत समुपदेशन करण्यात आले. एसपींच्या या आक्रमक पवित्र्यामुळे गुन्हेगारी वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

हेही वाचा : राहुरी–शनिशिंगणापूर प्रस्तावित रेल्वेमार्ग रद्द करावा; आमदार कर्डिले यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

भाईगिरी आणि दहशत खपवून घेणार नाही

या विशेष मोहिमेदरम्यान पोलीस मुख्यालयात हजर करण्यात आलेल्या सर्व २२० आरोपींकडून सविस्तर इंट्रॉगेशन फॉर्म भरून घेण्यात आले. तसेच, त्यांच्यावर भविष्यात होणाऱ्या प्रतिबंधक कारवाईच्या बंधपत्रांची (बॉन्ड्स) सविस्तर माहिती देऊन त्यांना कायद्याचा धाक दाखवण्यात आला. पोलीस प्रशासनाकडून आरोपींना कडक शब्दांत ताकीद देण्यात आली आहे की, भाईगिरी, गँगवार आणि खंडणी वसुलीचे प्रकार तात्काळ थांबवावेत. परिसरात मारामारी करणे, दहशत निर्माण करणे किंवा बेकायदेशीर शस्त्रांचा वापर करणे महागात पडेल.

नक्की पहा : कर्जतमध्ये पुन्हा वाहतूक कोंडी; विद्यार्थ्यांची सुरक्षा रामभरोसे

…तर कठोर कायदेशीर कारवाई (Police Action)

कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर तडीपार आणि मोक्कासारखी अत्यंत कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. या धडक आणि अनपेक्षित कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये पोलिसांचा चांगलाच धाक निर्माण झाला आहे. जिल्ह्यात शांतता व सुरक्षिततेचे वातावरण टिकवून ठेवण्यासाठी भविष्यातही अशा प्रकारच्या प्रतिबंधात्मक आणि कठोर कारवाया सातत्याने सुरू राहणार असल्याचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.