Police Transfers : जिल्हा पोलीस दलात खांदेपालट; कही ख़ुशी कही गम

Police Transfers : जिल्हा पोलीस दलात खांदेपालट; कही ख़ुशी कही गम

0
Police Transfers : जिल्हा पोलीस दलात खांदेपालट; कही ख़ुशी कही गम
Police Transfers : जिल्हा पोलीस दलात खांदेपालट; कही ख़ुशी कही गम

Police Transfers : नगर : जिल्हा पोलीस दलातील (District Police Force) चालू वर्षातील सुमारे ३०० पोलीस कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या (Police Transfers) गुरूवारी (ता.४) पोलीस मुख्यालयात (Police Headquarters) पार पडल्या. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन (Superintendent of Police Mummaka Sudarshan) यांनी आयोजित केलेल्या बदली दरबारात प्रत्येक कर्मचाऱ्याची भूमिका, गरज आणि पसंती जाणून घेत बदली प्रक्रिया राबविण्यात आली. या प्रक्रियेत काहींना मनासारखे पोलीस ठाणे मिळाल्याने आनंदाचे वातावरण होते, तर काहींना अपेक्षित ठिकाण न मिळाल्याने नाराजी दिसून आली.

प्रत्यक्ष भूमिका जाणून घेतल्यानंतर बदलीचे आदेश

एका पोलीस ठाण्यात किंवा शाखेत सलग अथवा खंडित स्वरूपात पाच वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांकडून यापूर्वी तीन पसंतीच्या ठिकाणांसह अर्ज मागविण्यात आले होते. बदलीपात्र कर्मचाऱ्यांना गुरूवारी सकाळी पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले होते. प्रत्येक अंमलदाराशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांची भूमिका जाणून घेतल्यानंतर बदलीचे आदेश देण्यात आले. सकाळी साडेआठ वाजता सुरू झालेल्या बदली प्रक्रियेत प्रथम श्रेणी पोलीस उपनिरीक्षक, सहायक फौजदार आणि पोलीस हवालदार यांच्या बदल्या करण्यात आल्या.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

अपेक्षित पोलीस ठाणे न मिळाल्याने काही नाराज (Police Transfers)

गुन्हे तपासाची जबाबदारी असलेल्या या अंमलदारांपैकी अनेक जण गेल्या अनेक वर्षांपासून अहिल्यानगर शहर व परिसरातील पोलीस ठाण्यांमध्ये कार्यरत होते. त्यामुळे जिल्ह्याच्या उत्तर व दक्षिण भागातील काही पोलीस ठाण्यांमध्ये तपास अंमलदारांची कमतरता निर्माण झाली होती. ही तूट भरून काढण्यासाठी काही तपास अंमलदारांच्या बदल्या त्यांच्या पसंतीपेक्षा रिक्त जागांचा विचार करून करण्यात आल्या. मात्र, काही कर्मचाऱ्यांना अपेक्षित पोलीस ठाणे न मिळाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. काही महिला पोलिसांच्या डोळ्यांत अश्रूही दिसून आले.

दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेत बदली मिळावी, अशी अनेक कर्मचाऱ्यांची इच्छा होती. अर्जातील पसंतीक्रमात एलसीबीचा समावेश असतानाही अधीक्षक सुदर्शन यांनी कोणालाही एलसीबीमध्ये बदली दिली नाही. त्यामुळे एलसीबीत जाण्याची अपेक्षा बाळगणाऱ्या कर्मचाऱ्यांचा हिरमोड झाला. काही पोलिसांनी विनंती बदल्यांसाठी अर्ज केले असले तरी त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. सध्या केवळ प्रशासकीय बदल्या करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या प्रक्रियेला पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्यासह अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि श्रीरामपूर विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे उपस्थित होते.