FDA : भेसळ आढळल्यास थेट करा तक्रार; तुकाराम मुंढेंनी जारी केला टोल फ्री क्रमांक

0
FDA : भेसळ आढळल्यास थेट करा तक्रार; तुकाराम मुंढेंनी जारी केला टोल फ्री क्रमांक
FDA : भेसळ आढळल्यास थेट करा तक्रार; तुकाराम मुंढेंनी जारी केला टोल फ्री क्रमांक

FDA : नगर : नागरिकांना थेट तक्रार नोंदवता यावी यासाठी अन्न व औषध प्रशासनाने विशेष संपर्क व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे. अन्नातील भेसळ, औषधांमधील गैरप्रकार तसेच गुटखा आणि पानमसाल्याच्या बेकायदेशीर विक्रीबाबत नागरिक आता थेट प्रशासनाशी संपर्क साधू शकतात. यासाठी 1800222365 हा टोल फ्री क्रमांक आणि [email protected] हा ई-मेल आयडी जाहीर करण्यात आला आहे.

हेही वाचा : पोलिसांवर गोळीबार करून आरोपी फरार

कारवाईचा तडाखा

राज्यभरात अन्न व औषध प्रशासनाने धडक मोहीम राबवत 6 दिवासांत 203 छापे टाकून 102 अटक जणांना करण्यात आली आहे. तर राज्यभरातील जवळपास 68 दुकानं आणि हॉटेल्स बंद करण्यात आली. आयएएस तुकाराम मुंढे यांनी नुकतीच अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारली. यानंतर राज्यभरात प्रतिबंधित गुटखा-पानमसाला विक्रेत्यांविरोधातील कारवाईचा तडाखा लावण्यात आला आहे.

नक्की पहा : कारवाईच्या भीतीने 350 किलो खवा फेकला

कारवाई अधिक तीव्र होणार (FDA)

अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कडक शब्दांत इशारा दिला आहे. आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना सोडणार नाही, असं म्हणत कारवाई अधिक तीव्र होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच आता जनतेला थेट तक्रार करण्याचं आवाहन केलं आहे. यासाठी टोल फ्री क्रमांक आणि ई-मेल आयडी शेअर करण्यात आला आहे. अन्न व औषधाबाबत किंवा गुटखा आणि पान मसालाबाबत नेमकी कुठे तक्रार करायची याची नागरिकांनी माहिती नसते. त्यामुळे आता मुंढे यांनी नागरिकांनी थेट त्यांच्याकडे तक्रार करण्यासाठी एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे.