Staging the theft of one’s own vehicle : स्वतःच्याच वाहनाच्या चोरीचा बनाव; विमा रक्कम लाटण्याचा बेत फसला

0
Staging the theft of one's own vehicle : स्वतःच्याच वाहनाच्या चोरीचा बनाव; विमा रक्कम लाटण्याचा बेत फसला
Staging the theft of one's own vehicle : स्वतःच्याच वाहनाच्या चोरीचा बनाव; विमा रक्कम लाटण्याचा बेत फसला

Staging the theft of one’s own vehicle : नगर : स्वतःच्या मालकीची चारचाकी वाहन चोरीला गेल्याचा खोटा बनाव (Staging the theft of one’s own vehicle) करून विमा कंपनीकडून (Insurance company) क्लेम मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने (Local Crime Branch) पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात फिर्यादीसह तीन जणांना अटक करण्यात आली असून सुमारे १० लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अर्शद आयुब शेख (रा. मुकुंदनगर, अहिल्यानगर) यांनी त्यांच्या मालकीची चारचाकी चोरीला गेल्याची तक्रार तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल केली होती. त्यानुसार तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.

चौकशीत धक्कादायक खुलासा

अहिल्यानगर शहरात वाहनचोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेला या गुन्ह्यांचा तपास करून आरोपींना जेरबंद करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. तपासादरम्यान ४ जून रोजी स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त माहिती मिळाली की, या प्रकरणात मैनुद्दीन शकील पठाण (रा. टिळक नगर, श्रीरामपूर) याचा सहभाग आहे. त्यानुसार पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने धक्कादायक खुलासा केला.
चौकशीत मैनुद्दीन पठाण याने अर्शद आयुब शेख यांच्या सांगण्यावरून आणि सलमान मेहबुब खान (रा. कोठला, अहिल्यानगर) यांच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली. हा सर्व प्रकार विमा कंपनीकडून क्लेमची रक्कम मिळवण्यासाठी रचण्यात आल्याचे तपासात समोर आले.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

वाहण चोरीची खोटी तक्रार (Staging the theft of one’s own vehicle)

पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेला सुमारे ५ लाख रुपये किमतीचा एक टेम्पो आणि ५ लाख रुपये किमतीची चारचाकी वाहन असा एकूण १० लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. तपासात फिर्यादी अर्शद आयुब शेख यांनीच स्वतःच्या वाहणाची चोरी झाल्याची खोटी तक्रार दाखल करून विमा कंपनीची फसवणूक करण्याचा कट रचल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे फिर्यादीसह त्याच्या दोन्ही साथीदारांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींसह जप्त मुद्देमाल पुढील तपासासाठी तोफखाना पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी तसेच त्यांच्या पथकाने केली.