
Prisoner who terrorizes with a sword : नगर : भिंगार कॅम्प परिसरात तलवार घेऊन दहशत (Prisoner who terrorizes with a sword) माजवण्याच्या तयारीत असलेल्या एका तरुणाला पोलिसांनी (Police) सापळा रचून जेरबंद केले. त्याच्याकडून धारदार लोखंडी तलवार जप्त करण्यात आली आहे. उदय अब्राहम ढगे (वय २२, रा. शांतीनगर, केदारवस्ती, सोलापूर रोड), असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
नक्की वाचा : अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची बदली; मुम्मका सुदर्शन यांची नियुक्ती
पोलिसांची चाहूल लागताच पळ काढण्याचा प्रयत्न
भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, भुईकोट किल्ल्याजवळून सोलापूर रोडकडे जाणाऱ्या मार्गावर एक संशयित इसम तलवार घेऊन फिरत आहे. माहितीची खात्री करून पोलिसांनी तत्काळ पथकाने संबंधित ठिकाणी सापळा रचला. काही वेळातच संशयित व्यक्ती हातात तलवार घेऊन येताना दिसला. पोलिसांची चाहूल लागताच त्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला; मात्र, पथकाने त्याला जागीच पकडले. पंचांसमक्ष झडती घेतली असता त्याच्याकडे धारदार तलवार आढळून आली.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
आर्म ॲक्ट नुसार गुन्हा दाखल (Prisoner who terrorizes with a sword)
या प्रकरणी कॅम्प पोलीस ठाण्यात आर्म ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर, पोलीस अंमलदार दिपक शिंदे, रविंद्र टकले, प्रमोद लहारे आणि कैलास शिरसाठ यांनी केली.


