Pune Crime : पुणे जिल्ह्यात चाललंय काय?; आता चाकणमध्ये मुलीचा विनयभंग, आरोपी अटकेत

0
Pune Crime : पुणे जिल्ह्यात चाललंय काय?; आता चाकणमध्ये मुलीचा विनयभंग, आरोपी अटकेत
Pune Crime : पुणे जिल्ह्यात चाललंय काय?; आता चाकणमध्ये मुलीचा विनयभंग, आरोपी अटकेत

Pune Crime : नगर : संपूर्ण जिल्हा सुन्न झाला आहे. नसरापूर आणि म्हाळुंगे येथील दुर्दैवी घटना ताज्या असतानाच, आता चाकण जवळील बिरदवडी येथे 11 वर्षीय मुलीचा विनयभंग झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी उत्तर चाकण पोलिसांनी 32 वर्षीय परप्रांतीय आरोपीला तातडीने बेड्या ठोकल्या आहेत.

हेही वाचा : आमदार सत्यजित तांबे यांनी मांडला पहिल्या १०० दिवसांच्या कामाचा लेखाजोखा

नेमकं प्रकरण काय?

काल दुपारी (ता. ०२) पीडित 11 वर्षीय मुलगी घरात कोणी नसल्याने घराला कुलूप लावून आपल्या काकाच्या घरी जात होती. यावेळी मुलगी एकटी असल्याचे पाहून आरोपी अरुण गयाप्रसाद मिश्रा (वय 32) याने घराच्या कंपाऊंडमध्ये प्रवेश केला आणि तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या चिमुकलीने अत्यंत धैर्याने तेथून पळ काढल्याने ती बजावली. मुलीने हा प्रकार आपल्या वडिलांना सांगितल्यानंतर, वडिलांनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेतली.

नक्की पहा : रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्ष नीता अंबानी साई चरणी

आरोपी अटकेत (Pune Crime)

घटनेचे गांभीर्य ओळखून उत्तर चाकण पोलिसांनी तात्काळ शोधमोहीम राबवून आरोपी अरुण मिश्रा याला ताब्यात घेतले. त्याच्या विरोधात पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.