Pune Crime : नसरापूर दुर्घटनेप्रकरणी प्रवीण तरडेंचा संताप; सोशल मीडिया पोस्ट व्हायरल

0
Pune Crime : नसरापूर दुर्घटनेप्रकरणी प्रवीण तरडेंचा संताप; सोशल मीडिया पोस्ट व्हायरल
Pune Crime : नसरापूर दुर्घटनेप्रकरणी प्रवीण तरडेंचा संताप; सोशल मीडिया पोस्ट व्हायरल

Pune Crime : नगर : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे चार वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाल्यानंतर तिची हत्या करण्यात आली आहे. या घटनेनंतर नातेवाईक आक्रमक झाले आहेत. या घटनेनंतर ग्रामस्थांसह नातेवाईक आक्रमक झाले आहेत. पुण्याच्या नवले पुलावर आंदोलकांनी ठिय्या मांडला आहे. जोपर्यंत न्याय मिळत नाही, आरोपीला शिक्षा होत नाही तोपर्यंत इथून हलणार नाही अशी भूमिका चिमुरडीच्या नातेवाईकांनी घेतली होती. दरम्यान, या घटनेवर मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ दिग्दर्शक आणि अभिनेते प्रवीण तरडे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. आरोपी असलेल्या नराधमाचा एन्काऊंटर झालं तरच हे सरकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचं आहे अशी प्रतिक्रिया प्रवीण तरडे यांनी दिली आहे.

हेही वाचा : पुणे जिल्ह्यात चाललंय काय?; आता चाकणमध्ये मुलीचा विनयभंग, आरोपी अटकेत

प्रवणी तरडेंची पोस्ट

नसरापूर लैंगिक अत्याचार प्रकरणाबाबत अभिनेते प्रवीण तरडे आक्रमक झाले आहेत. नराधमाचा एन्काऊंटर झालं तरच हे सरकार छत्रपती शिवाजी महाराजांचा विचारांचं आहे असं म्हणत त्यांनी फेसबुक पोस्ट केली आहे. एन्काऊंटर झालं नाही तर भोरच्या मावळ्यांनी कायदा हातात घ्यावा, अशी आक्रमक पोस्ट प्रवीण तरडे यांनी केली आहे.

नक्की पहा : वर्षभरात अहिल्यानगरच्या एसपी घार्गे यांची बदली… नेमकं कारण काय?

नातेवाईक आक्रमक (Pune Crime)

या घटनेतील नराधमाला पोलिसांनी अटक केली असली तरी चिमुकलीचे नातेवाईक आणि ग्रामस्थ प्रचंड संतापले. त्यांनी पुण्यातील नवले पुलाजवळ शनिवारी संध्याकाळी साडेसहा वाजल्यापासून ठिय्या आंदोलन सुरू केलं. चिमुकलीचा मृतदेह रुग्णवाहिकेत ठेवून त्यांनी ठिय्या आंदोलन केलं.