नगर : पुण्यात सध्या MPSC चा पेपर (Pune MPSC Student) फुटल्याने वातावरण हे चांगलंच तापलेले आहे. त्यातच आता स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या प्रथमेश दिलीप देशमुख (वय 28) या तरुणाने (Prathmesh Deshmukh) दोन दिवसांपूर्वी पुण्यातील नारायणपेठ परिसरात गळफास घेत आपलं आयुष्य संपवल्याची (Ending one’s life) धक्कादायक घटना घडली होती. त्याने टोकाचं पाऊल का उचललं याबाबत विविध तर्क वितर्क लावले जात आहेत. सुरवातीला आर्थिक विवंचनेतून त्याने हे टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आता पोलीस तपासात चक्रावून टाकणारी माहिती पुढे आली आहे.
नक्की वाचा : अहिल्यानगर महापालिकेचा विकास आराखडा प्रसिद्ध; ९ ऑक्टोबरपर्यंत घेता येणार हरकती
प्रथमेशने ऑनलाइन गेमिंग आणि बेटिंगच्या विळख्यात अडकून स्वतःचं आयुष्य संपवल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलॆ आहे.
नेमकं काय घडलं? (Pune MPSC Student)
प्रथमेश हा मूळचा धाराशीव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील खासापुरी गावचा होता. मागील 3-4 वर्षांपासून पुण्यात राहून तो एमपीएससीची तयारी करत होता. सदाशिव पेठेतील नंदनवन सोसायटीत तो भाड्याने राहत होता. इथेच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असतानाच त्याला ऑनलाइन बेटिंगचा नाद लागला. यात त्याला तब्बल चार लाख रुपयांहून अधिक रकमेचा आर्थिक फटका बसला आणि तो कर्जबाजारी झाला होता. मंगळवारी रात्री ११ वाजता तो खोलीवर आला. मात्र बुधवारी सकाळी तो बेडरूममधील छताच्या लोखंडी हुकाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह ससून रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवला.
अवश्य वाचा : २ कोटी कर्जावर तब्बल १८ कोटींचे व्याज;अहिल्यानगरच्या दोन सावकारांना अटक
आत्महत्येपूर्वी खोलीत सापडली सुसाईड नोट (Pune MPSC Student)
प्रथमेशच्या वडिलांचे आधीच निधन झाले असून घरी त्याची आई एकटीच आहे, तर त्याला चार विवाहित बहिणी आहेत. स्पर्धा परीक्षांमध्ये वारंवार आलेले अपयश आणि कर्जाचा मोठा ताण या मानसिक दडपणाखाली येत त्याने आत्महत्या केल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे.
आत्महत्येपूर्वी प्रथमेशने एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. यामध्ये त्याने कोणाकडून किती उसने पैसे घेतले आणि ते कुठे खर्च झाले, याचा तपशीलवार हिशोब मांडल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं. या चिट्टीत त्याने १८ ते १९ जणांकडून घेतलेल्या अडीच लाख रुपयांच्या कर्जाची नोंद केल्याचं समजलं आहे.ज्यांचे पैसे त्याने परत केले होते, त्यांच्या नावापुढे त्याने ‘टिक मार्क’ करून ठेवले होते. प्रथमेश आर्थिक विवंचनेत असल्याचं समजताच आत्महत्येच्या अवघ्या तीन दिवसांपूर्वी त्याचे दाजी आणि एक मित्र त्याला भेटायला पुण्यात आले होते. मित्रांसमक्ष त्याला धीर देत गावी परतण्याचा सल्लाही दिला होता. मात्र त्यानंतरही त्याने हे टोकाचं पाऊल उचललं आहे.



