Pune News : पुण्यात २६ मेपासून जमावबंदी लागू ; नेमका आदेश काय?

0
Pune News : पुण्यात २६ मेपासून जमावबंदी लागू ; नेमका आदेश काय?
Pune News : पुण्यात २६ मेपासून जमावबंदी लागू ; नेमका आदेश काय?

नगर : पुण्यात (Pune News) उद्या (ता.२६) रात्रीपासून जमावबंदीचे आदेश लागू (Orders Prohibiting Assembly) करण्यात येणार आहे. पुणे पोलीस आयुक्तालयाने पुढील १४ दिवस जमावबंदीचा आदेश लागू केला आहे. शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जमावबंदीचा हा आदेश २६ मे २०२६ पासून ८ जून २०२६ पर्यंत लागू राहणार आहे. या जमावबंदीच्या काळात कोणत्याही प्रकारचे मोर्चे, आंदोलने आणि सभा घेण्यास पूर्णपणे बंदी घातली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांविरोधात शहरातील विविध राजकीय आणि सामाजिक संघटना आक्रम झाल्या आहेत. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी हे आदेश जारी करण्यात आले आहेत.

नक्की वाचा: मान्सून महाराष्ट्रात कधी दाखल होणार? वाचा सविस्तर…

आंदोलन-मोर्चे सभांना बंदी (Pune News)

पोलीस प्रशासनाने जारी केलेल्या आदेशानुसार पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांनी एकत्र येणं, सार्वजनिक ठिकाणी सभा घेणं, मोर्चे किंवा मिरवणुका काढणं यावर पूर्णपणे बंदी आहे. तसंच तलवार, भाला, काठी, लाठी, बंदूक किंवा शारीरिक इजा करू शकेल अशी कोणतीही वस्तू सार्वजनिक ठिकाणी सोबत बाळगण्यास बंदी आहे. कोणतेही दाहक, स्फोटक आणि ज्वलनशील द्रव पदार्थ सोबत नेण्यावर निर्बंध असतील.

सार्वजनिक शांतता भंग करू शकतील अशा घोषणा देणं, चिथावणीखोर गाणी किंवा वाद्य वाजवणं यावरही बंदी आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर तात्काळ कायदेशीर गुन्हा दाखल केला जाईल. बकरी ईद आणि इतर सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी हा आदेश काढण्यात आला आहे. पुणे पोलिसांनी या आदेशाचे काटेकोरपणे पालन करण्याचं आवाहन केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील नागरिकांना इंधन वापराबाबत काटकसर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे मनपा अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी काही आदेश जारी करण्यात आले आहेत.

आदेशात नेमकं काय म्हटलं आहे? (Pune News)

अधिकाऱ्यांनी एकत्रित दौरा करताना कार पुलिंगद्वारे प्रवास करण्याचं नियोजन करावं.
अधिकाऱ्यांनी कार्यालयीन कामकाजाकरिता आवश्यक दौरे असल्यास सार्वजनिक वाहनांचा वापर करावा.
अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आठवड्यातील एक दिवस लोकल, मेट्रोने प्रवास करावा.
सर्व बैठका, प्रशिक्षण, चर्चासत्रे ऑनलाइन पद्धतीने आयोजित करावेत.